कंधार : आजच्या विज्ञान युगात व बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळीकडेच बदल झालेला असतानाही शिक्षकांचे कार्य मात्र अजूनही दीपस्तंभासारखे प्रेरणादायी असून आज ही समाजामध्ये शिक्षकाचे स्थान अग्रस्थानी आहे शिक्षक हे समाजातील चालते बोलते विद्यापीठ असतात. त्यामुळे शिक्षकांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना बाहेरचे व्यवहारिक ज्ञानही द्यावे, बऱ्याच ठिकाणी आई-वडिलांची विभागणी झालेली पाहतो मुले हे आई-वडिलांना म्हातारपणी आधार देत नाहीत असे रोजच वर्तमानपत्रांमध्ये वाचतो पण आज मुंडकर सरांच्या (गुंटुरकर)सेवापुर्ती कार्यक्रमाला त्यांच्या आईचे वय १०५ वर्ष असूनही उपस्थिती असल्यामुळे बरे वाटले असे आग्रही प्रतिपादन मुखेड भूषण सर्प रोग तज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांनी केले.
ते ३० जून रोजी जि प प्रा शाळा रातोळी तांडा (कॅम्प) शाळेचे मुख्याध्यापक मोहनराव मुंडकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानावरून बोलत होते. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आमदार राम पाटील रातोळीकर विधान परिषद सदस्य, शिवराज पाटील रातोळीकर पं.स.नायगाव, दशरथरावजी लोहबंदे नांदेड जिल्हा शिवसेना समन्वयक ठाकरे गट, शिवाजी पाटील बेळीकर जिल्हा कार्याध्यक्ष स्व.धा.दुकान, रमाबाई सोनकांबळे शा.व्य.स. रातोळी तांडा, कमलबाई पाटील सरपंच रातोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार रातोळीकर म्हणाले की मुंडकर सरांनी या ठिकाणी बरेच वर्षे सेवा केली अनेक विद्यार्थी घडविले पण मला केव्हांच भेटले नाहीत मला फक्त सेवापूर्ती सोहळ्यालाच बोलविले याचे कारण असे की कोणताही शिक्षक कोण्या गावात रुजू झाला की येथील राजकीय कोण आहेत अगोदर त्यांना भेटतात काही वशिला लावतात पण आज मुंडकर सर सारखे शाळा आणि विद्यार्थ्यांचे हित जपणारे आज ही काही शिक्षक आहेत. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला जमलेला जनसमुदाय पाहून मन भरून आले आम्ही शिक्षकांमुळेच घडलो आहोत त्यामुळे आज शिक्षकाची स्थान आग्रहाचे आहे.
यावेळी अनेकांची भाषणे झाले सूत्रसंचालन कराळे सर यांनी केले तर आभार शेळके व फसमले सर यांनी मानले या सत्कार सोहळ्याला जि प प्रा शाळा रातोळी तांडा (कॅम्प) सर्व शिक्षक स्टॉप, सरपंच, उपसरपंच, शालेय समिती, ग्रामपंचायत सदस्य, गावातील अनेक शिक्षण प्रेमी, नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.