ट्रॅव्हल्स व दुचाकीची धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

 

कंधार, (प्रतिनिधी)- कंधार लोहा रोडवरील नवीन बांधकाम होत असलेल्या सरकारी दवाखान्याजवळ नांदेड वरुन कंधार येणारी खाजगी ट्रॅव्हल्स एम एच १२ एफ झेड ८४६३ येत असताना व कंधारहून मोटारसायकल वरुन बोरी (खु) गावाकडे जात असताना आमने- सामने धडक होऊन दुचाकीस्वार राम रतन दुबुकवाड हे जागीच मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

कंधार तालुक्यातील बोरी (खु) येथील राम रतन डुबुकवाड हे कामानिमित्त कंधार आले होते. आपले काम आटपून दुचाकीवरून गावाकडे जात असताना नांदेड वरून कंधारकडे येणारी खाजगी ट्रॅव्हल्स व मोटार सायकलची कंधार लोहा रोडवरील नवीन बांधकाम होत असलेल्या सरकारी दवाखान्याजवळ आमने-सामने धडक होऊन दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. त्याला कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरने तपासून मृत घोषित केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *