कंधार : विश्वांबर बसवंते
सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या नऊ वर्षाच्या कालावधीत विविध प्रकारच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून या देशातील जनतेला अपेक्षित असलेली सर्वांगीण विकास कामे करत आहेत. सर्व सामान्य जनतेची व्यक्तिगत कामे असोत, की सार्वजनिक कामे असो ती कामे करण्यासाठी मी खासदार म्हणून प्रयत्नशील आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या देशातील एकही गरीब व्यक्ती बेघर राहू नये, असा संकल्प केला असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक बेघर गरिबांना पक्की घरे मिळाले असून उर्वरित एकही गरीब व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी काही छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या बाजूला सारून लवकरात लवकर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ पात्र व्यक्तीस मिळवून देण्यासाठी आपली सतर्कता दाखवा, असे संबंधित अधिकाऱ्यांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खडसावून सांगितले.
दि.८ जुलै २०२३ रोजी कंधार येथील संत नामदेव महाराज मंगल कार्यालयात खा.चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई व विकास कामे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंधारचे उपविभागीय अधिकारी डाॅ.शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रणिता ताई देवरे, वृद्ध कलावंत निवड समिती अध्यक्ष बाबुराव केंद्रे,जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर, कंधार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जफरोदिन बाहोदिन,तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी महेश पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावरील विविध खात्याचे प्रमुख अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज केंद्रात व राज्यात आपले भाजपाचे सरकार आहे. हे सरकार शेतकरी कष्टकरी व गरिबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजना या वाडी, तांडा, वस्तीपर्यंत पोहोचवून त्यांच्यापर्यंत सदर योजनेचा लाभ प्रत्यक्ष त्यांना मिळावा, या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा योजनांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी योग्य माहिती न देता चालढकलपणा करत असतील तर तात्काळ मला कळवा, असेही उपस्थित नागरिकांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आवाहन केले त्याचबरोबर विविध खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली त्याचबरोबर यापुढे अधिकाऱ्यांनी काम वेळेत व दर्जेदार करा अशी सूचना देण्यात आली.
हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड भाजपा सरचिटणीस प्रा.किशनराव डफडे, भाजपा शहर अध्यक्ष गंगाप्रसाद येन्नावार, भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, कैलास नवघरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख दत्ता डांगेव रजत शहापुरे, भाजपा नेते गोविंद मोरे, भाजपा युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर ,यांनी परिश्रम घेतले.