कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व सामान्य जनतेच्या समस्या अधिकारी -कर्मचारी यांनी जाणून घ्याव्यात तसेच त्याची सोडवणूक करावी.प्रशासनात आलेली मरगळ दूर व्हावी तसेच जनता दरबारात ज्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या अनुशंगाने संबधित विभागांने पाच दिवसात त्याचा निपटारा करावा व तसा अहवाल सादर करावा असा सुचना जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार तहसील कार्यालय च्या वतीने आयोजित जनता दरबार कार्यक्रमात दिल्या .
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक, विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या प्राणिताताई देवरे चिखलीकर तहसीलदार राम बोरगांवकर, डीवायएसपी थोरात, गटविकास अधिकारी पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष जफर बाहोद्दीन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी , पोलीस निरीक्षक मारकड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता , जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता , पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता , विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता, गटशिक्षणाधिकारी आगलावे, केंद्र प्रमुख केंद्रे,सामाजिक वनीकरण विभागाचे , भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगीरे, भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार,युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, माजी नगराध्यक्ष प्रतीनीधी चेतन केंद्रे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख दत्ता डांगे,रजत शहापुरे,उत्तम पाटील जाधव, यासह सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी यांची उपस्थिती होती .
दुपारी तीन वाजता वाजता सुरू झालेला जनता दरबार तीन तासाहून अधिक वेळ चालला .स्वतः जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग निहाय कामाचा आढावा घेतला उपस्थित नागरिकांनी आपआपल्या अडीअडचणी सांगितल्या जाग्यावरच काही तक्रारींचे निराकरण झाले.प्रशासनातील मरगळ दूर करून जनतेच्या अडीअडचणी वेळेत सोडवाव्यात तसेच येथे आलेल्या तक्रारी चे पाच दिवसात निपटारा करून संबंधितांना कळवावे असा सूचना प्रतापराव पाटील यांनी अधिकारी कर्मचारी याना दिल्या
विद्युत विभाग-कृषी विभागाच्या तक्रारी अधिक
होत्या . यामुळे संबंधित अधिकारी यांना सोमवारी कार्यालयात थांबुन तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केली.या अनुशंगाने ज्याच्या त्याच्या तक्रारी आहेत त्यांनी सोमवारी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या समक्ष आपले म्हणणे सांगावे त्याच्या समस्यांचे निराकरण केले जाईल असे निर्देश खा चिखलीकर यांनी दिले.तालुक्यातील जनतेला या जनता दरबाराचा मोठा फायदा झाला.