कंधार ;
मन्याड खोरे म्हणचे राजकीय व शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून महाराष्ट्रात नव्हे देशात सुपरीचित आहे.आयुष्याचे शंभर वर्ष दिवंगत डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेबांचा राजकीय व शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीतून दीन-दलित अन् सुग्या-मुग्यांच्या,शेतकरी, कामगार, शेतमजूर या समाजातील तळागाळील जनसामान्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र आपल्या सहकार्यासह जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत काम केले.अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे पंचाहत्तर वर्षापूर्वी मराठी अन् उर्दु भाषेत शिक्षण घेण्याची ज्ञानगंगा मन्याड खोर्यात प्रवाहित केली.पण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची शाळा नव्हतीच!त्यानंतर प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब यांनी छ.शंभूराजे इंग्लिश स्कूलची स्थापना करून मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठाण कंधारच्या माध्यमातून अध्यक्षा सौ.डाॅ.मनिषाताई पुरुषोत्तमजी धोंडगे व सचिव प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी हे ज्ञानालयाचे रोपटे लावले.त्यांच छ.शंभूराजे इंग्लिश मेडियम स्कूल कंधार हे बाळसे धरु लागले.दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यासाठी चित्र रंगभरण स्पर्धा आणि पाचवी ते आठवी इयत्तेसाठी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करुन दिवंगत डाॅ.भाई मुक्ताईसुत यांना अभिप्रेत असलेली स्पर्धा घेवून जयंती साजरी करुन अभिवादन करतांना त्यांच्या कार्याचा वसा घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावराव कुरुडे साहेब लाभले होते.तर प्रमुख मार्गदर्शक मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमराव धोंडगे साहेब लाभले होते. केवशसूताच्या पुर्णांगी मातोश्री मुक्ताई धोंडगे प्रतिष्ठाण कंधारच्या अध्यक्षा डाॅ.सौ.मनिषाताई पुरुषोत्तमराव धोंडगे मॅडम गुराखीपिठावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत डाॅ.भाई साहेबांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार वंदेमातरम या राष्ट्रीय गीतेने सुरुवात होवून ज्ञात-अज्ञात हुतात्म्ये अन् दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना आदरांजलि अर्पण करुन सुरुवात झाली.प्रास्ताविक प्राचार्या फरहाना मॅडम केले.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षिय समारोप करतांना माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांनी प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करतांना म्हणाले की, पुरुषोत्तम धोंडगे हे आपल्या वडीलासम शिस्तीचे भोक्ते आहेत.माझ्याही पुढे ते शिस्तीत संस्थेच्या बैठका घेऊन कुठल्याही कार्यक्रमात शिस्तीला महत्त्व देवून कार्य तडीस नेतात.त्यांनी वडीलांचा वसा अगदी तंतोतंत घेवून मन्याड खोर्यातील ढाण्या वाघ दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांचे कार्य पूर्ण करत आहेत.प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे यांनी आपले विचार ठेवतांना माझ्या बाबांनी जनसामान्यासाठी केलेले काम मला सदा प्रेरदायी आहे.त्यांनी घालून दिलेला सामाजसेवेचा कानमंत्र मी पुढे सुरु ठेवणार आहे.गुराखीपिठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतरच माझा असा माझा संकल्प असे उद्गार मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठाण कंधारच्या अध्यक्षा डाॅ.सौ.मनिषाताई पुरुषोत्तमजी धोंडगे मॅडम पूर्ण केला.याच कार्यक्रमात ज्यांचे हातावर पोट आहे अशा छोटा उद्योग करणाऱ्यांना हातगाड्यांचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब, प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांच्या समर्थ हस्ते हातगाड्यांचे वाटप केले. अनेक मान्यवरांच्या उपस्थित होते.या कार्यक्रमास श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील नांदेड,सोनखेड, हाळदा,दिग्रस,कुरुळा,कंधार,विद्यामंदिर प्राथमिक,लोहा आदी शाखातील गुरुजनांनी या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे पर्यवेक्षक म्हणून काम केले.छ.शंभूराजे इंग्लिश स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार या ज्ञानालयातील सर्व स्टाफनी आपापले नेमून दिलेले काम अगदी चोखपणे सांभाळले.सौ.वंजे मिसनी दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब अन् लालबावटाची आकर्षित रांगोळी रेखाटून उपस्थितीत सर्वाची मने जिंकली.या स्पर्धेत ८५० विद्यार्थ्यांनी चित्र रंगभरण स्पर्धेत सहभाग नोंदवला. तर १५०० विद्यार्थ्यांनी सामान्यज्ञान स्पर्धेत सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून छोट्या गटासाठी मिल्टनची पाणी बाटल व मोठ्या गटासाठी परीक्षेचे पॅड सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन सौ.चव्हाण मिस यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होवून स्पर्धेला सुरुवात झाली.