संघटित बनो, संघर्ष करो’ परिषदेच्या संयोजन समिती अध्यक्षपदी प्रज्ञाधर ढवळे यांची निवड

 

नांदेड – येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची शहरात होणाऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय ‘संघटित बनो, संघर्ष करो’ परिषदेच्या संयोजन समिती अध्यक्षपदी प्रज्ञाधर ढवळे यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एन. डी. गवळे यांची तर निमंत्रकपदी सेवानिवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हटकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

गेल्या पंचवीस वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या सत्यशोधक विचार मंच आणि फुले आंबेडकरी विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘संघटीत बनो संघर्ष करो’ एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विविध क्षेत्रातील विचारवंत सहभागी होणार आहेत. या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी एन. डी. गवळे तर निमंत्रकपदी सेवानिवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांची निवड करण्यात आली. तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्रज्ञाधर ढवळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने देण्यात आले.

बैठकीस अॅड. भीमराव हटकर, राज गोडबोले, सुभाष सुर्यतळे, डॉ. राम वनंजे, अशोक कांबळे, रमेश कसबे, प्रभू ढवळे, एम. डी. जोंधळे, चेतन भुजबळ, श्रावण नरवाडे, मिलिंद नरवाडे, राहुल गवारे, एन. एम. झडते, एन. टी. पंडित, संजय जाधव, ज्ञानोबा दुधमल, पी. के खानापूरकर, गणेश हटकर, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, रणजीत गोणारकर, मारोती कदम, शंकर गच्चे, कैलास धुतराज, प्रशांत गवळे, रुपाली वागरे वैद्य, ज्योती गायकवाड, सुमनबाई गच्चे, थोरात बंधू, बाबुराव पाईकराव, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, प्रकाश ढवळे नागलगांवकर, शिवाजी गोडबोले आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *