स्व.डाॅ.शंकरराव चव्हाण आधुनिक भगीरथ – संजय भोसीकर..! डॉ.चव्हाण जयंतीनिमित्त भोसीकर दांपत्याच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप,वृक्षारोपण

 

कंधार (प्रतिनिधी )
स्व.डॉक्टर शंकरराव चव्हाण हे मराठवाड्यासाठी आधुनिक भगीरथ होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जायकवाडी विष्णुपुरी सारखे महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवून मराठवाड्यासाठी जलसिंचन व पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय करून दिली म्हणून त्यांना मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ होतं असे प्रतिपादन,नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी पानशेवडी तालुका कंधार येते जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,खाऊ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये बोलताना केले.

 


गावच्या सरपंच सौ.गेणुबाई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर,हणमंत पाटील पेठकर, यशवंत पाटील भोसीकर,शालेय समितीचे अध्यक्षा सौ.मनिषा बसवंते,उपसरपंच चत्रुबाई मोरे, मुख्याध्यापिका सौ.निलिमा यंबल,भगवानराव पाटील मोरे सूर्यकांत गुरुजी मोरे,जयराम पाटील मोरे पंढरी पाटील मोरे,जळबा पाटील मोरे,दत्ता पाटील शिंदे,गणेश मोरे आदींसह गावातील नागरिक विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 


कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.शालेय समितीच्या वतीने मान्यवर मंडळींचा शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खाऊ वाटप व वृक्षारोपण भोसीकर दांपत्य व मान्यवर मंडळी च्या हस्ते करण्यात आले..

 

यावेळी बोलताना संजय भोसीकर म्हणाले की स्व.डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वकांक्षी असे जलसिंचनाचे प्रकल्प राबवून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली म्हणून त्यांना जलतज्ञ देखील असे म्हटले जाते स्व.डॉक्टर शंकरराव चव्हाण हे कुशल प्रशासक अत्यंत कडक शिस्तीचे असे प्रभावी नेते होते त्यांचे कार्य सदैव मराठवाड्यासाठी प्रेरणादायी राहील असेही संजय भोसीकर म्हणाले.याप्रसंगी बोलताना सौ.वर्षाताई यांनी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत पानशेवडी व शंकरराव चव्हाण यांच्यातील असलेल्या स्नेहपूर्ण संबंधाचे वर्णन केले पानशेवडीच्या विकासामध्ये डॉक्टर चव्हाण यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभलेले आहे असे सौ.वर्षाताई म्हणाल्या याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन मुलांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचे आव्हान देखील माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई यांनी याप्रसंगी केले.

कार्यकमाचे प्रस्ताविक सौ.निलिमा यंबल यांनी केले पंढरी पाटील मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन मरशिवणे सर यांनी केले यावेळी शालेय विद्यार्थी पालक गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *