धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ चाटे टी व्ही यांना नुकताच ‘ प्राची कलमकार – २०२३’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अधिक माहिती अशी की प्रा डॉ चाटे तुकाराम वैजनाथराव यांनी सोशल मीडिया हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित केले आहे. त्यांच्या या साहित्यिक योगदानाबद्दल नुकताच त्यांना प्राची डिजिटल पब्लिकेशन तर्फे देण्यात येणारा ‘ प्राची कलमकार – २०२३ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.