हरित कंधारच्या वृक्ष लागवड उपक्रमात रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा कंधारचा सहभाग.

 

 

कंधार ; प्रतिनिधी

हरित कंधार परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून कंधार शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे, हरित कंधार -स्वच्छ कंधार उपक्रमांतर्गत फळझाड वाटप, फळझाड लागवड ,शहरातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड ,घन जंगल वृक्ष लागवड, आदि वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहेत…

हरित कंधारच्या वतीने यावर्षी 15 जुलै 2023 रोजी संयोजक शिवा मामडे यांच्या वतीने पांगरा येथील कासारखेडा परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली नुसती वृक्ष लागवड न करता त्या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी हरित कंधार परिवाराने घेतली आहे या वृक्ष लागवड उपक्रमात कंधार येथील रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेतील

 

विद्यार्थ्यांथी,शिक्षक यांनी सहभाग घेतला व प्रत्यक्ष वृक्ष लागवड करत निसर्गाचे समतोल अबाधित राखणे ,निसर्ग संवर्धन करणे व वृक्षाचे लागवडीचे महत्त्व व वृक्ष लागवड तंत्रज्ञान आत्मसात केले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *