कंधार:( विश्वंभर बसवंते )
परि. सहाय्यक जिल्हा अधिकारी देवयानी यादव (आयएएस) यांनी नुकताच कंधार उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ केला असल्याची माहिती कंधार उपविभागीय कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव (आयएएस)यांनी दि.१७ जुलै २०२३ रोज सोमवारी कंधारच्या परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारताच कंधार तहसीलदार राम बोरगावकर, लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे, व उपविभागीय कार्यालयाच्या वतीने देवयानी यादव यांचा नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, डी. डी. लोढे, अनिल परळीकर, पि.डी.जोगदंडे, रेश्मा झंपलकर, राजश्री जोंधळे, श्रीनिवास ढगे, राजेश गायंके, प्रमोद पाटील,यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,
यावेळी तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सहाय्यक जिल्हा अधिकारी देवयानी यादव यांनी यापूर्वी तहसीलदार म्हणून अर्धापूर येथे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी १७ जुलै ते १८ ऑगस्ट २०२३ अशा एक महिन्याच्या कालावधीसाठी कंधार येथे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.