माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत श्री गणपतराव मोरे विद्यालयाचे लिपीक आनंदराव केंद्रे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

 

कंधार ; प्रतिनिधी

श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधारचे लिपीक श्री आनंदराव आप्पाराव केंद्रे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज दि १९ जुलै रोजी संपन्न झाला , यावेळी मान्यवरांच्या हस्ते आनंदराव केंद्रे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .


सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार ईश्वरराव भोसीकर तर प्रमुख पाहूणे सचिव भाऊसाहेब मोरे , बाबुराव केंद्रे उमरगेकर यांची प्रमुख
उपस्थिती होती .

 

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून व कै श्री गणपतराव मोरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली .

कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक बालासाहेब लुंगारे , एन एल रामपूरे, रामचंद्र गायकवाड , संभाजी कोनाळे , भगवान कंधारे , गोविंद कौसल्ये आदी सर्व माजी मुख्याध्यापक उपस्थित होते .

विद्यमान मुख्याध्यापक संजय वागलगावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली , यावेळी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कार मुर्ती आनंदराव केंद्रे यांच्या सेवेतील कामाची वाहवा करून विद्यालयाच्या यशात त्यांचे योगदान असल्याचे सांगितले व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक परमेश्वर सोळंके ,नवाज शेख ,प्रविण गव्हाणे , सौ .सुमन वाघमारे , रावसाहेब कामजळगे , संदीप चव्हाण ,निळकंठ लुंगारे ,सौ .सुरेखा ठाकुर , प्रवितकुमार आनकाडे , आदीसह शिक्षकेत्तर कर्मचारी बालाजी उगले , भानुदास सोनकांबळे , शिवाजी पदेवाड आदींनी परिश्रम घेतले .

सेवापुर्ती सोहळ्याला
शिक्षक ,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच
श्री केंदे यांचे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन प्रवितकुमार आनकाडे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *