लोहा ; विनोद महाबळे
लोहयाच्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुविधेचा अभाव असून रुग्णाची हेळसांड होत आहे. यासाठी बेजबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ? असा संतप्त सवाल लोहयाचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांचे नातू तथा युवा समाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पुढे बोलताना सुधाकर पाटील पवार म्हणाले की, मोठा गाजावाजा करून लोह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर सुरू करण्यात आली परंतु खोदा पहाड निकला चूहा याप्रमाणे सगळे फेल झाले असून या कोविड सेंटर मध्ये रुग्णाची बेहाल होत आहे.
सुविधेचा मोठा अभाव आहे. शासनाच्या वतीने कोरोना मुक्त करण्यासाठी रुग्णालयाला प्रचंड प्रमाणात निधी येत आहे राज्यात बाकीचे विकास कामे शासनाने खोळंबत ठेवले आहेत.
नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत सर्व निधी कोरोनासाठी कोविड सेंटरसाठी वापरण्यात येत आहे.शासनाचे धोरण अगदी चांगले आहे परंतु ते राबविणारे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे त्याकडे ध्यान नाही.
बेजबाबदारपणे वागणे आहे आपण जनतेचे सेवक आहोत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे विसरून गेले आहेत. लोहा येथील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांचा कर्मचाऱ्यांचा अभाव आहे तीनच कर्मचारी आहेत आणि रुग्ण भरपूर आहेत
त्यामुळे त्यांच्याकडे कोणती सुविधा पोहोचत नाही तीन मजली उपरुग्णालयाची व कोविड सेंटरची इमारत आहे रुग्णाला तिसऱ्या
मजल्यावरून खाली गोळ्या औषधी साठी यावे लागत आहे परंतु गोळ्या-औषधी व्यवस्थित भेटत नाही. खाण्यापिण्याची चांगली सोय नाही शौचालयाची,परिसराची साफसफाई नाही .
तिसऱ्या मजल्यावरून वयोवृद्ध रुग्ण चढ उतार करतेवेळी धाप लागत आहे.लगेच त्यांना श्वासोश्वास बरोबर नाही म्हणून नांदेडला जा म्हणत आहेत.
पेपर बाजी करून पेपरला जाहिरात देऊन लोहा येथील कोविड सेंटरमधील डॉक्टराच्या कर्मचाऱ्याच्या जागा भरण्यासाठी लोहा तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकार्याने मुलाखती घेऊन यादी प्रसिद्ध केली
परंतु प्रत्यक्ष अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही डॉक्टर व इतर कर्मचारी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध झाले नाहीत वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे याकडे अजिबात लक्ष नाही तेथे लाईटची सुविधा बरोबर नाही.
लोहयाचे कोविड सेंटर काय फक्त देखावा साठी स्थापन केले आहे का शासनाच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी आहे का रुग्णाच्या सुविधांकडे लक्ष देण्यासाठी नाही का असा संतप्त सवाल सामाजिक
कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी केला असून याकडे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आरोग्य विभाग यांचे अजिबात लक्ष राहिले नाही.
लोकप्रतिनिधी तर याकडे बघायलाही तयार नाहीत निवडणुकीत बडेबडे बाता करणारे आता विसर् भोळ्यावाणी वागत आहेत काम सरो वैद्य मरो असे त्यांचे चालले आहे.जनतेच्या जीवावर मोठे झाले पण जनतेच्या आरोग्याकडे त्यांचे लक्ष राहिले नाही.लोहयाच्या कोवीड सेंटरमध्ये कसल्याही प्रकारच्या चांगल्या सुविधा नाहीत
याकडे आता स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः जातीने लक्ष द्यावे कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी व लोहयाच्या कोविड सेंटरकडे लक्ष देऊन रुग्णाला चांगल्या सोयीसुविधा व औषधोपचार ,
जेवणाची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था करून द्यावी व त्यांचे प्राण वाचवावे अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी केली आहे.