Post Views: 53
नांदेड – जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हर घर नर्सरी’ उपक्रमांतर्गत जवळ्यात उद्दिष्टनिहाय नियोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आता विविध ठिकाणी पालकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, पालक अमोल गोडबोले, उत्तम गोडबोले, बालाजी झिंझाडे, हैदर शेख, मनिषा गच्चे आदींची उपस्थिती होती.
सदरील उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थीनिहाय वृक्षनिर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत हर घर नर्सरी’ हा उपक्रम राबविण्यात आला. शाळा कार्यक्षेत्र परिसरात तसेच शेतीच्या बांधावर, पडिक जमिनीवर, घराच्या परसात, मंदिर परिसरात अशा विविध ठिकाणी आंबा, पेरु, जांभूळ, बदाम, चिंच, कडुनिंब, शेवगा, करंजी, पिंपळ, वड आदी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याकामी कृष्णा शिखरे, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, रितेश गवारे, योगेश मठपती, संकेत शिखरे, अक्षरा शिंदे, तेजल शिखरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.