नांदेड जिल्ह्यातील सि.एस.सी. केंद्र चालकाकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी; सौ.आशाताई शिंदे …. दोषी असलेल्या सि.एस.सी. केंद्र चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करा

 

प्रतिनिधी

लोहा कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर, दहीकळंबा ता. कंधार सह नांदेड जिल्ह्यातील अनेक गावागावात अनेक शेतकरी बांधव पिकविमा भरण्यासाठी सि.एस.सी. केंद्र चालकाकडे विमा भरतात, पण काही शेतकरी सि.एस.सी. केंद्र चालकाकडे पिक विमा भरण्यासाठी गेले असता त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली की सि.एस.सी. केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, काही शेतकऱ्यांनी मुदती अगोदरच पिक विमा भरला होता जसं की शिवप्रसाद शंकरराव ईसातकर, बालाप्रसाद केशव होळगे, संतोष संभाजी सोनटक्के, रुद्रेश्वर कागदे राहणार उस्मान नगर ता. कंधार व मौजे दही कळंबा येथील अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा सी.एस.सी. आयडी केंद्र चालकाकडे या भागातील शेतकरी बांधव पीक विमा भरण्यासाठी गेले असता या शेतकऱ्यांचा पिक विमा सी.एस.सी. केंद्रचालक स्वतःचा बँक खाते पिक विमा भरत असलेल्या शेतकऱ्यांच्या ऑनलाइन अर्ज दाखल करते वेळेस हे केंद्र चालक आपला बँक खाते जोडत असल्याचे निदर्शनास आले असल्याची गंभीर बाब काही शेतकऱ्यांच्या निदर्शनात आली होती, त्यामुळे अनेक पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची सी.एस.सी. केंद्र चालकाकडून आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते, नांदेड जिल्ह्यात यापूर्वी सन 2021- 22 व सन 2022- 23 या वर्षात पण अनेक सी.एस.सी केंद्र चालकांनी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आली असल्याची गंभीर बाब भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्याकडे या गंभीर विषयी शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या,

 

या गंभीर बाबीची दखल घेत शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ . आशाताई शिंदे यांच्या सूचनेवरून शेकापचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर यांनी काल दिनांक 31 जुलै 2023 रोजी आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना जिल्ह्यातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सी.एस.सी. केंद्र चालकांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आलेले आहे. यावेळी आशाताई शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणात विशेष लक्ष देऊन दोषी असलेल्या सी.एस.सी. केंद्र चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आशाताई शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली, यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील बाबर, लोहा तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल, दक्षिण तालुका अध्यक्ष गिरीश डिगोळे, उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, माजी सरपंच दिगंबरराव डिकळे, सरपंच दुलेखा पठाण, डि.के. कांबळे कलंबरकर सह शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

———

*अधिवेशनात लक्षवेधी मांडणार*
:*आमदार शामसुंदर शिंदे*

 

लोहा कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी सी.एस.सी. केंद्र चालका कडून पिक विमा भरला असून सी.एस.सी .केंद्र चालक स्वतःचा बँक खाते शेतकऱ्यांच्या पिक विमा ला जोडत असल्याचा गंभीर प्रकार मतदारसंघातील काही ठिकाणी उघडकीस आल्याने ज्या ज्या भागात शेतकऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली असलेल्या सी.एस.सी. केंद्र चालकावर कठोर कारवाई होण्यासाठी व मी हा अत्यंत संवेदनशील शेतकरी बांधवांचा विषय अधिवेशनामध्ये मांडणार असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सी.एस.सी. केंद्र चालकावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसून मतदारसंघातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *