जिल्हा जात पडताळणी कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

नांदेड ; प्रतिनिधी

 

जिल्हा जात पडताळणी कार्यालयात साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे, बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड येथे, दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्री. बापू दासरी यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुकुंद मुळे, सिद्राम रणभिरकर, विठ्ठल आडे, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, अनिकेत वाघमारे यांच्यासह सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *