कंधार ; प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतीदिन आज दि .१ ऑगस्ट २०२३ रोजी कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत अभिवादन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी.जी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका सौ कागणे यु.एम . आगलावे ए.बी , केंद्रे आर एस . सौ चंद्रकला तेलंग , माणिक बोरकर यांची उपस्थिती होती .
यावेळी सई माधव भालेराव , प्राची गोविंद जाधव , आराध्या संतोष कंधारे , शेख अब्दुलमुकित अहेमद , घुमे गुणवंत भास्कर , ग्वेद राजु केंद्रे , सृष्टी संजय पवळे , सोनपरी गोविंदराव हेंडगे , आरोही राहुल जोंधळे , श्रावणी संतोष जायेभाये , राधीका राम जायेभाये , आदित्यी शिवानंद कागणे , तनुजा तुकाराम नेरले , गोविंद संदिप गोरे , आदी वर्ग पहीली ते चौथी च्या विद्यार्थांनी भाषण केले .
शाळेचे शिक्षिका सौ कागणे यु एम यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जिवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन केले . तर शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी.जी यांनी अध्यक्षीय समारोपात शाळेच्या विविध उपक्रमात विद्यार्थी सहभाग घेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थांचे कौतूक केले . आज भाषण करणाऱ्या विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य देवून सत्कार केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालकताई चंद्रकला तेलंग यांनी तर आभारप्रदर्शन माणिक बोरकर यांनी मानले .