जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र भाग्यनगर नांदेड येथे बालाजी डफडे यांचा सत्कार

 कंधार ; जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र भाग्यनगर नांदेड येथे होमगार्ड पथक कंधार चे कर्तव्यदक्ष तालुका समादेशक अधिकारी मा श्री बालाजी डफडे यांनी त्यांच्या 35 वर्षाच्या अखंडित सेवा कार्यकाळात निष्काम सेवा हे ब्रीद अंगीकारून होमगार्ड संघटनेत दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावली त् व नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात त्यांनी खूप मोठे योगदान दिल्याबद्दल व त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल कृतज्ञतापूर्वक सन्मान अपर पोलीस अधीक्षक नांदेड तथा जिल्हा समादेशक अधिकारी होमगार्ड नांदेड मा श्री अबिनाशकुमार (भा पो से )यांनी करून त्यांच्या मनोगतातून होमगार्ड संघटनेत शिस्तीने अमूल्य वेळ देऊन सेवा बजावल्याबद्दल भावी जीवनास शुभेच्छा दिल्या. भावपूर्ण सत्काराला उत्तर देताना बालाजी डफडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व किल्लारी भूकंपग्रस्तांची सेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर बंदोबस्त, विविध निवडणूक बंदोबस्त इ. अतिशय महत्त्वाच्या बंदोबस्त प्रसंगी स्वतःला झोकून देऊन निष्काम सेवेचे ब्रीद अंगीकारून प्रामाणिकपणे नांदेड होमगार्ड दलात सेवा बजावल्याचे व या सेवेतून मिळालेल्या मानसिक समाधानाबद्दल मी व माझा परिवार अतिशय समाधानी असल्याचे भावनिक उद्गगार काढले .यावेळी जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड नांदेड चे केंद्रनायक मा. श्री अरुणजी परिहार, सेवानिवृत्त प्रशासकिय अधिकारी मा श्री भगवानराव शेटे , सामुग्री प्रबंधक सुभेदार मा. श्री राम पिंजरकर* , *मुख्य लिपिक श्री शिवकांत घाटोळ, होमगार्ड पथक नांदेडचे तालुका समादेशक अधिकारी मा. श्री* *प्रकाशराव कांबळे ,माजी समादेशक* *अधिकारी श्री एस एस* *बेग होमगार्ड पथक कंधार चे माजी तालुका समादेशक अधिकारी मा. श्री माधराव भालेराव पाटील ,होमगार्ड पथक मुखेड चे मा. समादेशक अधिकारी सतीश पाटील भुरेवार ,विद्यमान तालुका समादेशक अधिकारी मा. श्री कैलास पाटील , होमगार्ड पथक भोकर चे तालुका* *समादेशक अधिकारी मा.श्री शेख अन्वर ,माजी केंद्रनायक मा.अशोकराव कठाळे, मा श्री रामस्वामी जेंकुट मा. श्री रत्नाकर सुंकेवार ,श्री ग्यानोबा जोंधळे ,होमगार्ड पथक कंधार चे पलटन नायक श्री भिमराव जोंधळे, श्री राजकुमार कदम इ. सह नांदेड जिल्ह्यातील विविध तालुका होमगार्ड पथका चे मानसेवी अधिकारी व होमगार्ड जवान बंधू -भगिनी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संपूर्ण* *संचलन मा.श्री प्रकाशराव कांबळे व आभार पलटण नायक श्री बलबीर यांनी* *मानले* .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *