तृप्ती संजय भोसले चे यशाची भरारी ;इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथे आय आय टी प्रवेशास पात्र

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथे आय आय टी प्रथम वर्षात कू.तृप्ती संजय भोसले राहणार मोर्तळवाडी,ता.उदगीर, जि.लातूर ही प्रवेशास पात्र झाली असून तिला या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल तिचे आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व पाहुण्यांमध्ये, तसेच आजी – आजोबांनी तसेच मित्र परिवारातर्फे आनंद व कौतुक होत आहे. या मुलींची आई श्रीमती रेखा संजय भोसले यांनी आपल्या जन्मदात्या आई सौ. निर्मलाबाई वाकडे,वडील सेवा निवृत्त प्राचार्य आदरणीय श्री शिवाजीराव वाकडे सर, व तिचा भाऊ प्रा.श्री हनुमंत वाकडे यांच्या मदतीने आणि तृप्तीची आई रेखाने पतीच्या पश्चात मुला बाळाकडे काळजीपूर्वक हिंमतीने लक्ष देवून गरुड झेप घेण्याचे संकेत दिले होते. म्हणूनच भारताची राजधानी दिल्ली येथे कू. तृप्तीला नामांकित इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. तसेच रात्रंदिवस अभ्यास करून यशाचे तृप्तींने शिखर गाठले आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होते आहे. पतीच्या पश्चात अशी गुणवंत मुले घडणे हे समाजाला एक उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी हिंमत हरून चालणार नाही. आपण श्रम परिश्रम केल्यानंतर यश आपल्या पदरात नक्कीच पडणार यात मुळीच शंका नाही .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *