नांदेड ; कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे उत्कृष्ट विचार सौ. श्यामसुंदरी मुंडे, व सांस्कृतिक प्रमुख व्ही.डी.बिरादार यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप छान भाषणे केली.सौ.मुंडे यांनी त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक,आणि साहित्यिक विषयांचे अनेक उदाहरणे दाखले देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच व्ही.डी.बिरादार यांनी तर चौफेर मार्गदर्शन करीत, तेवढ्या संघर्षाच्या काळात फक्त दीड दिवस शाळेत गेलेले, अण्णाभाऊ साठे यांनी आपले आनंदमय,सुखमय जीवण जगण्याची कला, त्यांच्या साहित्य क्षेत्रातील केलेले अजोड असे कार्य आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्याला तर सर्व सुख सोयी असताना आपण एवढे दु:खी जीवन का जगतो? हे आपल्या मनाला शांतपणे विचार करण्यास लावले पाहिजे. अशा नेत्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन सुखमय,आनंदमय करून जीवनातला आनंद मिळवावे. अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करून संबोधित केले. या प्रसंगी अशा नेत्यास आपल्या संस्थेतर्फे,व सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम .