नांदेड ; कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे आज दिनांक:03/08/2023 रोज गुरुवार,सकाळ सत्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान भाषणे केली. त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक *शिवनंदा गोरे* यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग व कार्याविषयी जाणीव जागृती करून देत विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केले. तसेच सांस्कृतिक प्रमुख *व्ही.डी.बिरादार* यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनातील सर्व प्रसंग बारकाईने सांगत सांगत यापासून विद्यार्थ्यांना बोधपर मार्गदर्शन करीत होते. उदाहरणार्थ: गुलामगिरी, दरोडेखोर , व्यसनमुक्ती अशी अनेक उदाहरणांची उकल करीत तसेच समाज उपयोगी कामे केल्यास समाज आपणास केव्हाच एकटे पडू देत नाही. हे आवर्जून सांगण्यात आले. असे दिनदुबळ्यांचे कैवारी, सर्वसामान्यांचे समस्या जाणून घेणाऱ्या नेत्यांना शतशः नमन करून आपल्या वाणीस विराम देत, वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. अशा तऱ्हेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा कार्यक्रम सुंदर रित्या पार पडण्यास मदत केली.