नांदेड ; प्रतिनिधी
जुलमी इंग्रज सरकारविरोधात क्रांतीचा एल्गार करून प्रतिसरकार स्थापन करण्याचे कार्य क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले. शिक्षण व वाचन संस्कृतीचे मूल्य ग्रामीण भागातील जनतेत रुजवून लोकजागृती करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी. समितीचे अध्यक्ष श्री. मा. पी.बी. खपले, समितीचे उपायुक्त श्री. मा. अनिल शेंदारकर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
सिद्राम रणभिरकर, बालाजी शिरगिरे, विठ्ठल आडे, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, सुनील पतंगे, संदीप सूर्यवंशी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.