कंधार; प्रतिनिधी
सध्या रणधुमाळी सुरू असलेल्या कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून काल दि. ०१ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे समर्थकांच्या वतीने 09 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे दाखल केले आहेत, यामध्ये माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, राम गोरे, प्रदीप हुंबाड, रमाकांत जोगदंड, गोपाळ जाधव, कमलकिशोर बुरपल्ले, संभाजी पानपट्टे, धनराज पाटील लुंगारे या 09 आमदार शिंदे समर्थकांनी आपले नामनिर्देशन पत्र कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयामध्ये दाखल केले आहेत, यावेळी लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, पारडीचे माजी सरपंच दिगंबर डिकळे, घोडजचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नागोराव लाडेकर ,व्हाईस चेअरमन संभाजी लाडेकर,अशोक बोधगिरे, महेश पिनाटे, माजी सरपंच राष्ट्रपाल चावरे, उपसरपंच कृष्णा परोडवाड, अवधूत पेठकर, गंगाधर चिखलीकर सह कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्व ताकदीनिश व विकास कामावर लढवणार असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले, यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते, सिद्धू वडजे, सुनील सुपलकर, चौकी महाकाय चे सरपंच हनुमंत कदम सह बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.