कंधार- कंधार शहरात लवकरच भव्य आणि दिव्य स्वरुपात क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिले.
कंधार येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. मारोती पंढरे होते. श्री शिवाजी कॉलेजचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, भाजपाचे अध्यक्ष भगवान राठोड, भाजपाचे शहर अध्यक्ष अँड. गंगाप्रसाद यन्नावार, सरचिटणीस मधु पाटील डांगे, शिवसेनेचे धनराज लुंगारे, माजी नगरसेवक सुनिल कांबळे
माजी प्राचार्य, लेखक, गीतकार-संगीतकार कवी माधवराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रविण पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्याचे अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष मा.प्राचार्य माधवराव जाधव यांनी क्रांतीकारी व ऐतिहासिक कंधार नगरीत क्रांतीगुरु लहूजी साळवे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. आपण केलेली मागणी लवकरच मार्गी लावून तमाम जनतेचे व राष्ट्र भक्तांचे स्वप्न साकार करणार असल्याचे प्रविण पाटील चिखलीकर यानी उपस्थितांना आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू मळगे, कैलास कांबळे, पद्मभूषण जाधव निरंजन वाघमारे, महेंद्र कांबळे, साईनाथ मळगे, महेश कांबळे, दयानंद मळगे व जयंती मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रम ची सांगता झाली.