जितके वर्ष तितके लाभार्थी या तत्वानुसार कृपाछत्र उपक्रमाच्या चौथ्यावर्षी लोकसहभागातून २०२३ छत्र्या वितरणाचे उदिष्ट भाजपा व लायन्स तर्फे ठेवण्यात आले असून देणगीदारांची नावे छत्रीवर दोन्ही बाजूला छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, लायन्स सेंट्रल अध्यक्ष ला.ॲड.उमेश मेगदे व संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात जागोजागी अतिवृष्टी होत असून गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घेऊन शंभर टक्के लोकसहभागातून खऱ्या गरजूंना छत्र्या देण्यात येणार आहेत.आता पर्यंत ३६५ छत्र्यांसाठी देणगीदार मिळाले आहेत.त्यामध्ये खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सिडको मंडलाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्यातर्फे सफाई कामगारांना ८० छत्र्या व भाजपा रेल्वे पार्सल कामगार आघाडी रेल्वे स्टेशन नांदेड यांच्या तर्फे ५० छत्र्या हमालांना वाटप करण्यात येणार आहेत.धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी ३०, तसेच कै. केरबा माधवराव गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार आणि कै. महेशराज जायस्वाल यांच्या स्मरणार्थ स्नेहलता जायस्वाल हैद्राबाद यांनी प्रत्येकी २५ छत्र्या दिलेल्या आहेत.प्रत्येकी २० छत्र्यांसाठी देणगी देणाऱ्या मध्ये विश्वजीत मारोती कदम धानोरा कौठा,सिद्राम सूर्यभान दाडगे,अविनाश रामभाऊ चिंतावार मुबंई,शैलेश इनामदार ठाणे यांचा समावेश आहे.मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी,सुधाकर रामराव जबडे देगलूर,वसंत अहिरे,संजय प्रभाकर कलकोटे, सुनीता दीक्षित वसरणी यांनी प्रत्येकी १५ छत्र्यांसाठी योगदान दिले आहे.
छत्र्या घाऊक बाजारातून मधून खरेदी करण्यात येत असून दोन्ही बाजूला नाव छपाईच्या शुल्कासह एका छत्रीची किंमत रुपये १६० राहणार आहे.किमान १५ छत्र्यासाठी रू.२४०० देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्याच देणगीदारांच्या हस्ते करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी १६६८ छत्र्यांची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन भाजपा नांदेड महानगर,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.