मी सागर माने , बीड
लिहावं वाटतय एका विलक्षण स्त्रीबद्दल , माझं वय २६ आहे आणि सहा वर्षांपूर्वी सह्याद्रीवर एक सीरीयल सुरु होती तिथे मी स्पोटबॉय म्हणून काम करत होतो त्यात सोनल मॅड्म ॲक्टर म्हणून काम करत होत्या हे माझ्या २ आठवड्यापुर्वी लक्षात आलं कारण त्यांची यूट्यूब वर आलेली एक मुलाखत मला माझ्या मित्रांनी पाठवली होती. त्यांचं शुटींग संपल्यावर त्यांनी मला त्यावेळी ५०० रुपये भेट म्हणुन दिले होते . त्या ॲक्टर म्हनुन भारी आहेतच पन मानूस म्हनुन पण भारी आहेत . त्यांच्याशी फोनवर बोलुन त्यांना ही आठवन सांगितली आणि भेटायची इच्छा व्यक्त केली तर त्या लगेच हो पन म्हनाल्या. त्या लेखिका म्हनुन एवढ्या मोठ्या झाल्या हे मला मुलाखतीतुन समजलं आणि लय भारी वाटलं कारन त्या वेळी त्यांनी दिलेले पैसे मी आईच्या औषधला वापरले होते त्यामुळे देव त्यांचं भलच करनार होता. मी आज मुंबईत स्पोटबॉय म्ह्नुन काम करतो मॅडम. तुमची पुस्तके पन वाचेन.मॅड्म तुम्ही परत सिनेमात काम करा मॅड्म. आनी हो हे मी माझ्या मित्राकडुन लिहुन घेतोय कारन मला असे लिहीता येत नाही.
काही चूक असेल तर माफी करा.