पुरूष मला कायमच आवडतात आणि पुरूष हृदय तर त्याहूनही कारण त्यांच्या हृदयात कितीही खोल गेलं तरीही ते म्हणतात , फक्त तुच आवडतेस मला आणि तेही सगळ्या जणीना सांगतात फक्त माझ्यापुढे त्यांचं काहीही चालत नाही कारण ५ व्या मिनीटात त्यांची कुंडली मांडते आणि दुसऱ्या दिवशी पुरूष हृदय लिहीते.. त्यांचं I lv yu सुध्दा तितकच ताकदीने पचवते जितकं त्यांचं फ्लर्टींग पचवते.. काही स्त्रियांच्या बाबतीत पुरूष लबाड आणि माझ्यासाठी मला कायम चिरतरुण ठेवणारं अमृत म्हणजे पुरूष.
बस झालं कौतुक आता इनबॉक्सातले किस्से ऐका..
एक म्हणतो , मॅम I am lyke you.. याचा अर्थ तुम्हीच समजुन घ्या आणि त्याचं पुढचं वाक्य म्हणजे , मी तुमच्यासाठी काय पण करेन.. काहिही मागा मॅडम.. सचिन ला मेसेज वाचुन दाखवले आणि विचारलं काय मागु रे ??.. तो म्हणाला , मी जे स्वातंत्र्य तुला दिलय ते तो देइल का विचार. आयला सचिनने तर विकेटच काढली राव ( डायरेक्ट छकडी ) .. अर्थात तोही पुरूषच आहे..
दुसरा म्हणतो , सोनल मॅडम , मी सिंगल आहे वय २४ आहे, मला तुम्ही आवडता , तुमच्याशी मैत्री करायची आहे .. याला सांगावं वाटतय , अधिक मास आहे , माझी मुलगी २२ वर्षांची आहे .. जावई म्हणुन ये .. वाण देइन .. दुसरं तर माझ्याकडे द्यायला काहीही नाही.. पण अगदी मनापासून सांगु , २४ वर्षाचा मुलगा फ्लर्ट करतो तेव्हा अजुन तरुण व्हावं वाटतं. भले ते आकर्षण असेल पण माझ्या आरोग्यासाठी संजीवनी आहे.. पुरुषांनी फ्लर्टींग नाही करायचे तर मग कोण करणार ना.
हे तर त्याहूनही भारी मित्रांनो प्रेमाचा सल्ला , sonal mam like you , love You .. असे मेसेजेस तुम्ही wp वर पाठवता ते माझ्या नवऱ्याकडे जातात कारण तो त्याचा नंबर आहे रे.. सचिन म्हणतो , सोनल तु म्हणत नाहीस इतक्या वेळा तुझे वाचक lvyu म्हणतात.. आता या वाचकांचं काय करायचं राव.. नशीब माझा नवरा या सगळ्याचा आनंद घेतो म्हणुन नाहीतर डोवोर्स झाला असता .. जरा मेसेजेस करताना जपुन करा रे..
माझा संसार करुदेत मला ..
मॅडम तुमचं क्लींनीक कुठे आहे हो ??.. मला सेक्स बद्दल प्रश्न आहेत .. मला मुल होत नाही आणि बायकोला सेक्स बद्दल काहीही माहीत नाही.. अरे हो भावा , आता कळतय का मित्रांनो , लैगिकतेवर लिहीण्याची आणि बोलण्याची का गरजआहे ते.. प्रचंड अज्ञान आणि व्यक्त न होणं यामुळे अनेक प्रश्न उभे आहेत.. पुस्तके वाचा .. चर्चा करा.. सोनल मॅडम लव्ह यु म्हणुन तुमचं पोट भरणार नाही.. माझे युट्युबवरचे व्हीडीओ पहा ..
सोनल मॅडम , तुमचं प्रोफाईल पाहिलं , तुम्ही काय करता ??.. यांनी बहुधा प्रोफाइल ला माझे फोटो पाहिले असावेत म्हणुन हा प्रश्न पडला असावा. .. सुंदर डोळ्यांनी काय पहावं आणि काय घ्यावं हेही कळत नसेल तर हे आयुष्य व्यर्थ आहे.. मॅडम मुलाखत पाहिली पण तुमची शुध्द भाषा समजत नाही आता मात्र पुणेरी हाणावा लागेल …… टोमणा हो..
किती त्या उचापती ना.. पुढच्या जन्मी पुरूष होवुन या सगळ्याचा बदला घ्यावा का ??.. नको त्यापेक्षा हाआनंदच भारी आहे.. तुम्ही फ्लर्टींग करा आणि मी लिहीते.. तुम्हीच माझे प्रेरणास्थान आहात.. मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि पुढच्या भागासाठी मेसेजेस ची वाट पहाते..
सोनल गोडबोले