लोहा; प्रतिनिधी
लोहा शहरात 01ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोहा शहरात मोठ्या उत्साहात व थाटामाटा साजरी करण्यात आली होती, पण जयंतीनिमित्त लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर साठे जयंतीच्या निमित्ताने जयंती मंडळांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त च्या सर्व कमानी बॅनर होल्डिंगच्या लोहा नगर परिषदेकडून सर्व अधिकृत परवानगी घेऊन जयंतीनिमित्त मोठमोठे होर्डिंग बॅनर व कमानी शहरात उभारण्यात आले होत्या,साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती ०१ ऑगस्ट च्या मध्यरात्रीला अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उभारण्यात आलेल्या कमानी व बॅनर ज्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्नडॉ. आण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज या सह सर्व महापुरुषांचे फोटो या होर्डिंग व बॅनर वर होते, पण ०१ ऑगस्टच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात लावलेले बॅनर व कमानी फेकून देऊन व महामानवांचे बॅनर रोडवरील चिखलात खड्ड्यात टाकून बॅनर वरील सर्व महामानवांच्या फोटोची विटंबना केल्याबद्दल अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ लोहाच्या वतीने ०२ ऑगस्ट रोजी लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उन्हाळे व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते,
पण जवळपास या घटनेला 24 तासाचा कालावधी होऊनही लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष उन्हाळे यांनी समाजकंटकावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही, या अनुषंगाने काल दिनांक ३ ऑगस्ट रोजी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली समाजकंटकावर गुन्हे दाखल होण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने लोहा पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढून लोहा पोलीस ठाण्यात समाजकंटकावर गुन्हे दाखल होण्यासाठी आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले,
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व दादागिरी करणाऱ्या प्रवृत्तीच्या दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल होण्यासाठी व ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकापाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, जयंती मंडळाचे तथा मातंग समाजाचे नेते पांडुरंग दाढेल, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, शेकापचे तालुकाध्यक्ष नागेश पाटील हिलाल,उपसभापती श्याम अण्णा पवार, काँग्रेस पार्टीचे लोहा तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, गटनेते पंचशील कांबळे, माजी नगरसेवक अनिल दाढेल, उत्तम महाबळे, अकबर मौलाना, माजी नगरसेवक सरपंच पंकज परिहार,आश्र्विनी कापुरे, डी के कलांबरकर व शेकापसह अनेक पक्षातील महिला व पुरुष मातंग समाज बांधव महिला पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी काल दिनांक ०३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या विधान परिषद सभागृहात लोहा येथील घटनेच्या निषेधार्थ समाजकंटकावर गुन्हे दाखल करण्यासाठी लक्षवेधी मांडली आहे, मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.