प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र कंधार संचालिका ब्रह्मकुमारी ज्योती बहेनजी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कंधार  ; ( दिगांबर वाघमारे )

सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था वाशी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा सावित्रीबाई संस्था 2023 चा राज्यस्तरीय महिला पुरस्कार ओमशांती ईश्वरीय विश्वविद्यालय उपकेंद्र  संचालिका ब्रह्मकुमारी ज्योती बहेनजी यांना आज जाहीर झाला आहे .

ज्योती ब्रह्मकुमारी बहेनजी यांनी ईश्वरीय विश्वविद्यालय उपकेंद्र कंधारच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज प्रबोधन केले आहे . महिलांचे मिळावे घेऊन मार्गदर्शन केले तसेच रक्तदान शिबिर , योग शिबिर , तरुणींना मार्गदर्शन , वृक्षारोपण , सर्व धर्मांतील संतांचे महामेळावा असे अनेक उपक्रम त्यांनी कंधार शहरासह तालुक्यात राबवले आहे या सामाजिक कार्याची दखल घेऊन सदरील वाशी येथील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला .

वाशी सेक्टर – 16  विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी खासदार सुप्रियाताई सुळे , रूपालीताई चाकणकर , गीता चापके , शाहिद सय्यद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्काराचे वितरण होणार आहे . हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्योती बहेण जी  यांच्या वर सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *