बुद्धाच्या निरव करूणेच्या कडेशी निपचित पडलेलं गाव एकतप या मातीवर घट्टउभा राहून
रानात काव्याचा मळा फुलऊन मराठीमनाला सुगंधित करणारा शब्दपंढरीतील या नामदेवाला भेटण्यासाठी आम्ही शब्दवारकरी निघालो होतो .
पळसखेड्याच्या रस्त्यावर गाडी धावत होती जसजसे गाव जवळ येत होतं तशी मनाची स्पंदणंही वाढू लागली .. एका रानवेड्या ,अंखंड मातीत फुललेल्या या रानफूलाला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी गोजांरल , यशवंतरावा पासुन शरदपवारांन पर्यंत लतादिदी पासून … पु.ल. पासून… आजच्या सर्व क्षेत्रातील लोंकांनमध्ये ज्यांनं आपलं वलय हृदयात स्थापित केलं . त्यांच्या घरातील एका सदस्यांच्या ओळखिने त्यांची वेळ घेतली होतीच पण त्यांच्याशी संवाद होईल या बाबत शाश्वति नव्हती. पळसखेडे वरून पुढे दोन कि.मी. गाडी गेल्यानंतर प्रर्फूल्ल महानोर ने सांगितले की येथून दादाची शेती लागते ते आजही ७५ वर्षाचे झालेले असतांनाही शेती पाहतात … ज्याचं या रानाशी मातीशी किती घट्टनातं आहे त्यांच्या रानातल्या या निसर्गाच्या व त्या योगानं आलेल्या प्रेमकवितेच्या निर्मीतीचा एक मुख्य धागा लक्षात यायला लागला
“या नभाने या भुमीला दान द्यावे
अण् या मातीत मी चैतंन्य गावे.
कोणती पुण्याई येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे”,
चिंब पाऊसांन रान झालं आबादाणी….. नभ ऊतरलं अंग झिम्माड झालं… कितीतरी….
….दिवस मावळतीलाकलत शेंदर्या रंगाला गिळंक्रत करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होता गाडी फार्म हाऊसवर थांबली व या रानवेड्या कवीच्या मातीवर पहिलं पाऊल नव्यानं मातीवर मोडकं तोडकं लिहणारी आम्ही चौकडी मी , अमृत तेलंग , व्यंकटेश काटकर, शिवाजी जोगदंड आमचे पडले. धन्यता लाभली..
दादा ची भेट झाली ..बाहेर अंधार पडला होता पण आतून आम्ही उजळून निघत होतो ते बोलत होते त्यांचा कवितेचा जीवन प्रवास मांडत होते .. त्यांच्या रानातल्या ,मातीशी घट्ट चिकलेल्या एक एक कवितेचा पदर उकलतं होता , लहानपणापासूनचे अभंग, गवळणी , लोकगितांचे संस्कार , जात्यावरल्या ओव्यांशी नातं , शेतीमाती हिरवळ या निसर्गातून फुलतं गेलेली कविता … त्यांना मुखदगत असलेले अभंग .. लहानपणापासूनच पुस्तकाची केलेली पारायणे अनुभवाची शिदोरी आमच्या पुढ्यात ठेवत होते
कवितेने काय द्यावे .. राजकारणातील , चित्रपटसृष्टीतील या महाराष्ट्राच्या मातीतील जवळ जवळ सारेच या सावरखेड्याच्या मळ्यात येऊन गेलेले .. ते म्हणत होते “मला कमीत कमी चारशे वर्ष जगायचे ” त्या मागचा
भावार्थ उलगडत होता संत पंरपरेतील ज्ञानेश्वर तुकाराम
ऐवढ्या वर्षा नंतरही ओवी, अभंगाच्या रूपाने आजही जिवंत आहेत .. दर्जेदार वैश्विक साहित्य चिरकाल टिकतं
आपलं जगण्याच्या खूणा कुठल्याही प्रभावाविरहीत साहित्यात उतराव्यात .. आपली कविता आपल्या भुभागातील सहज बोलीचे प्रतिनिधित्व करते … कवितेतल्या जागा ते सहजपणे सांगत होते आणि आम्ही नवखे श्रिमंत झाल्यांची अनुभूती घेत होतो .. कविता ही बिनकामाचा उद्याेग नव्हे यावर विश्वास पक्का झाला होता … मी काचरतच माझ्या ” गावभुईचे गोंदण ” काव्यसंग्रहाची स्क्रिप्ट पाठराखणेचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्याकडे दिली ” मला आवडल्या तर निश्चित लिहीण ” म्हणाले .. ७५.व्या वर्षातही दादाची साहित्य उर्मी कमी झाली नव्हती आम्ही निरोप घेऊन परतीच्या
मार्गाला निघालो .. नकळत आमच्यात एक उर्जा संचारित
झाली होती .. आठ दिवसानंतर पळसखेड्या वरून प्रफुल्ल दादाचा फोन आला ” दादांनी , तूमच्या कवितेवर
एक पानभर पाठराखणं लिहली ,मी पाठवतोय ” … माझ्या आनंद गगणेला मिळाला ..माझ्या कविता मला बर्या वाटत होत्या सर्वांनप्रमाणे पण या वयात दादा वाचतील का? लिहतील का? हूरहूरी होती … माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला ना.धो. महानोरांची पाठराखण मी धन्य झालो.
पुढं कवितेचा समज यायला तेव्हा पासूनच उराशी बाळगलेलं स्वप्न माझ्या पहिल्या काव्यस़ंग्रहाच प्रकाशन दादाच्याच हस्ते दादांच्या अमृतमहोत्सवी वर्षात रानमळ्यात काव्यपंढरीत त्याच मातीत जिथे बसून दादांनी कवितेचा मळा फुलवला ते ही स्वप्न पुर्ण झालं (१७/१२/१७) त्याचे साक्षीदार जेष्ठ साहित्यिक भगवान देशमुख ,कवी श्रीराम गव्हाणे , शिवाजी अंबुलगेकर ,अमृत तेलंग ,लक्ष्मण मलगीरवार , पांडुरंग पुठृठेवाड ,राजेश जैन ,दत्ता वंजे हे गणगोत होते .
गेल्या वर्षी पद्मश्री रानकवी ना.धो.महानोर दादाचा शंकर साहित्य दरबाराच्या वतीने नांदेड येथील कुसूम सभागृहात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांच्या हस्ते जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता .तेव्हा ही कवी श्रीकांत देशमुख दादाच्या घरी .दादांचा आहेर कपडे देऊन श्रीकांत दादांनी सन्मान केला तेव्हा ही साहित्य व्यवहारा विषयीचं त्याचं बोलणं ह्दयाच्या आतील तळाला धडका देत होतं…
गेल्या महिन्यात प्रफुल्ल दादाशी फोनवर बोलतांना दादांची प्रकृती विषयी विचारलं तेव्हाच त्यांना पुण्याला नेल्याचे कळाले होते .आणि आज सकाळी प्रदीर्घ काळ काव्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रानकवी पद्मश्री महानोर दादा गेल्याची बातमी आली .. गहिवरून गेलो .
श्रीनिवास मस्के,
बरडशेवाळा
नांदेड ,९२७१००८८९९.