कंधार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी,शिवसेना,संभाजी ब्रिगेड एकत्र मैदानात

कंधार ; प्रतिनिधी

कंधार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येत निवडणूकीत करिष्मा दाखवण्यासाठी कंबर कसली आहे.आज या तिन्ही पक्षांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
कंधार कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील आठवड्या पासून अनेक कारणाने चर्चेत आहे.या निवडणूकीचे सर्व सोपस्कार सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली पार पडले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.कुणालाही कानोकान पत्ता न लागू देता प्रशासनाने या निवडणूकीची सर्व तयारी चालवली होती.अशा अशायाचा बातम्या माध्यमातून प्रसिध्द झाल्या होत्या.माध्यमांच्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला.

 

त्यानंतर आज या निवडणूकीत आपली ताकत सिध्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले,उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते ऍड.मुक्तेश्‍वर धोंडगे,उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कर्‍हाळे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाट यांच्या पुढाकाराने प्रस्थापित सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत धुळ चारण्यासाठी एकत्रीत येत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक,तालुका प्रमुख कंधार परमेश्वर पाटील जाधव,विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,लोहा तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल , वंचित तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे, वंचित महिला आघाडी साधना ऐगंडे, ता महासचिव बंटी गायकवाड,तालुका संघटक पंडित देवकांबळे , किसान सेना तालुका प्रमूख शिवाजी पा कदम,युवासेना उपजिल्हाप्रमुख दिगांबर इंगोले, पं. स. सदस्य उत्तम चव्हाण, विश्वेवर पापिनवार ,कुरुळ्याचे चेरमन जीएम पवळे,उपतालुकाप्रमुख भगवान जाधव,शिवसेनेकडुन तालुकाप्रमुख परमेश्वर,गणेश कुंटेवार, विवेश्वर पापिनवार, भगवान जाधव, सौ.सुभद्राबाई बोरोळे, रत्नाकर धर्मेकर, सौ.पुष्पाताई खुडे, जीएम पवळे, दिगांबर इंगोले, मनोहर पेठकर, शिवाजी कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून सरस्वतीबाई प्रभाकर गवारे,ग्रामपंचायत मतदार संघातून सविता उत्तमराव नाईकवाडे, ग्रामपंचायत अनु जाती जमाती मतदार संघातून रणजीत हैबती कसबे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.आगामी काळात इतर काही बडे पक्ष या तिन्ही पक्षासोबत येणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *