कंधार ; प्रतिनिधी
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून महात्मा गांधीजींचा केवळ अपमान केला नाही तर संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा निषेध करत कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कंधार व तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी अनिल उर्फ एकनाथ मोरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर ,माजी नगराध्यक्ष रामराव पवार ,जेष्ठ नेते अॅड पुलकुंडवार , शहराध्यक्ष हम्मीद सुलेमान, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजीउपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे, माजी नगरसेवक शहाजी नळगे, युवानेते स्वप्नील पा लुंगारे, माजी सभापती भाऊसाहेब पा कदम, मागासवर्गीय सेल जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस सो मि कंधार सतीश देवकत्ते, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अजमोद्दीन बाबर महमद, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे, अजिंक्य पांडागळे, मन्मथ यासह कार्यकर्ते उपस्थित होते.