फ्रेंडशिप डे

 ( ऑगस्ट पहिला रविवार)
रोज नवीन व्यक्ती संपर्कात येतात.. एकमेकांचे मित्र होतात.. काहीजण वर्षानुवर्षे मैत्री निभावतात .. काहीजण जीव ओवाळून टाकतात.. काहीजण रात्रीअपरात्री सुद्धा मैत्रीला तत्पर असतात.. माझा प्रिय मित्र माझा भगवंत ( श्रीकृष्ण ) पण तो रोज मला भेटु शकत नाही म्हणुन त्याने अनेक मित्रांची फौज माझ्या दिमतीला ठेवली आहे.माझे बाबा ,सासरे , भाऊ, नवरा , मुलगी हेही माझे मित्रच आहेत.. सगळ्यासोबत मी सगळ्या विषयावर बोलु शकते.. पण तरीही यांच्याकडे असलेली कमी किवा माझ्या अनेक वेगवेगळ्या गरजा म्हणु किवा वेगळा स्पर्श म्हणु किवा अजून काहीही म्हणा अनेक विविधरंगी ,विवीध ढंगी मित्र देवाने दिले आहेत.
कायमच नशीबवान असलेली मी सोशल मिडीयावरुन सुध्दा माझे अनेक मित्र झाले आहेत… जगतमित्र म्हणा ना..
रविवारी आम्ही ही गृपने एकत्र भेटण्याचे प्लॅन केले आहेत. तुम्हीही केले असालच.. पण घरी असलेले सदस्य वयस्कर आई वडील किवा आपला पार्टनर हा आपला आधी मित्र त्यालाही फ्रेंडशीप बॅंड बांधायला विसरु नका.. कारण सुख आणि दुखात मित्र पोचेपर्यंत घरचे आपल्यासोबत आपल्या जवळ असतात.. आणि हो , खरे मित्र कोण हेही आपल्याला ओळखता यायलाच हवं ना..
मैत्री हवी अर्जुन आणि श्रीकृष्णसारखी आणि नवरा बायकोचं नातं हवं सोनल सचिनसारखं.. आयुष्यात बेस्ट मधलं बेस्ट निवडा . मैत्री करताना सुध्दा पैसे , प्रॉपर्टी पाहुन मैत्री न करता त्याचे विचार पहा..जात धर्म न पहाता विश्वास पहा.. व्यंग न पहाता संग पहा. चांगले मित्र मिळायला नशीब लागते ज्यांच्याकडे ते आहेत त्यांनी ते जपा आणि आयुष्यभर मैत्रीदिन साजरा करा. कोणी रुसला असेल तर त्याला मनवायला हाच योग्य दिवस आहे.. त्याला आपल्या आयुष्यात परत आणायला नक्की प्रयत्न करा.. रविवारी भेटू..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *