पानभोसी केंद्राची शिक्षण परिषद व सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न 

 

 

कंधार ; प्रतिनिधी 

 02 आॅगस्ट 2023 रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा पानभोसी येथे अतिशय उत्साही वातावरणात शिक्षण परिषद पार पडली शिक्षण परिषद आणि वयोमानानुसार 37 वर्षे सेवा पुर्ण करुन केंद्रिय आपग्रेड मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सौ.शमशद म.इब्राहिम यांचा सेवा पुर्ती सोहळा घेण्यात आला .

कार्यक्रमाच्या उद्घाटक पानभोसी च्या सरपंच सौ राजश्री मनोहरराव भोसीकर ह्या होत्या प्रमुख पाहूणे शिक्षण विस्ताराधिकारी श्री संजय येरमे  तर अध्यक्षस्थानी म्हणून केंद्र प्रमुख उद्धव पा सुर्यवंशी , प्रमुख उपस्थिती मा. पूर्व मुख्याध्यापक मन्मथ किडे, अपग्रेड मुख्याद्यापक कुलकर्णी मॅडम, पेठकर तथा किडे मॅडम श्री विठ्ठल दगडगावे आणि सत्कार मुर्ती शमशाद मॅडम व इब्राहिम सर हे होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.केंद्रात नव्याने बदलून आलेल्या श्री बेटमोगरेकर सर, कदम सर, कपाळे सर, गायकवाड सर, गोंटे सर, युसुफ शेख सर, नागरगोजे मॅडम व कुलकर्णी मॅडम यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.

‌‌ पहिल्या सत्रात शिक्षण परिषद पार पडली, नियोजनाप्रमाणे सर्व सुलभकांनी आपापल्या विषयावर चर्चा केली. शेख सरांनी विद्याप्रवेश हा विषय इंग्रजीचे साहित्य वापरून अतिशय सुंदर रितीने सादर केला.आजच्या शिक्षण परिषदेचे खास वैशिष्ट्य ठरले. लोहबंदे सर सेतू अभ्यासक्रम यावर सविस्तर मार्गदर्शन केले, पांडागळे सरांनी App , FLN फ्लॅन विषयी माहिती दिली तर घोरबांड सर,कपाळे सर यांनी मार्गदर्शन केले.‌श्री सुर्यवंशी सरांनी प्रशासकीय सुचना देऊन शिक्षण परिषेदेचा हेतू व सौ शमशाद मॅडम यांच्या कार्याबध्दल गौरव व कृतज्ञता व्यक्त केले विवीध आहावाल टप्प्याचे संकलन केले.

 

द्वितीय सत्रात मा. शिक्षण विस्ताराधिकारी श्री संजय येरमे  यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार मुर्ती सौ.शमशाद बेगम यांचा सहपती सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्यानंतर फक्त दीड महिन्याच्या कालावधीतच सर्वांच्या मनात आपल्या प्रेमळ स्वभावाने व काम करुन घेण्याच्या हातोटीने सर्वांच्या मनात घर करुन गेल्या. अनेक शिक्षक बांधव व भगिनीनी आपले मनोगत व्यक्त केले.

शमशाद मॅडमनी निरोपाच्या भावुक भाषणात 37 वर्षाचा जीवन पट थोडक्यात सांगीतला.मॅडमने शाळेसाठी एक मोठा भिंतीवरील घड्याळ भेट दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर रितीने श्री शेख सरांनी केले.सर्वांना सुरुची भोजनाची व्यवस्था श्री वैजनाथ गर्जेसर व सर्व शिक्षक भगिनी यांच्या नेतृत्वा खाली केंद्रिय प्रा शा पानभोसीच्या वतिने करण्यात आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *