आज चुकून माझ्याकडून साडेसात हजार रुपये सचिन गोडबोले यांच्या फोन पे अकाउंट ला केले आणि त्यांनी ते पैसे मला परत केले मॅडम बद्दल जे बरेचसे ऐकले होते त्याचाच हा एक प्रत्यय फेसबुकच्या आणि युट्युब च्या माध्यमातून मध्यमातून सोनल मॅडम यांचा मला परिचय झाला. आणि एक आणि एका योग्य व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो आहोत हे खरे ठरले धन्यवाद सोनल मॅडम कृपया ही पोस्ट फेसबुकला टाकावे श्रीकृष्ण फ्रॉम नासिक
हरे कृष्ण .. हरे कृष्ण.. कृष्ण कृष्ण हरे हरे..
हरे राम हरे राम .. राम राम हरे हरे
…. वरील मेसेज माझ्या वाचकाचा जसाच्या तसा कॉपी पेस्ट केलाय आणि त्याच अनुषंगाने मी आजचा लेख लिहीत आहे..
माझ्या मैत्रीणीच्या बाबतीत घडलेली एक घटना सांगते.. तिला दुकान विकत घ्यायचं होतं.. तिच्याच सोसायटीतील एक माणूस त्याचं शॉप विकणार होता…सोसायटीतील होता ,,ओळखीचा होता ,दुकानही आवडलं.. त्यानुसार व्यवहार ठरला.. एके दिवशी ती व्यक्ती तिच्याकडे आली आणि म्हणाली , मला ४०,००० रूपयाची गरज आहे.. आता देशील का ?? .. शॉपच्या व्यवहारात कमी करुन उरलेले पैसे दे.. तिने विचार केला , आपल्याकडे पैसेही आहेत , आणि आता त्याला गरज आहे आणि ते नंतर वजा करता येतील .. गरज आहे तर त्याला देउ म्हणुन तिने कॅश दिली आणि नंतर ती व्यक्ती म्हणाली , तुम्ही मला पैसे दिलेच नाहीत.. तिला वाईट वाटलं की आपण त्याच्यावर विश्वास ठेवला.. त्याची सही घेतली नाही किवा लिहुन घेतलं नाही..
एके दिवशी तिने हा किस्सा मला सांगितला आणि त्याच दरम्याने मी सरश्री यांचं शीबीर करुन आले होते .. मी तिला म्हटलं,अगं त्याने तुला फसवलं नाही , आता तुला फसवलं वाटतय ,त्याने त्याचे पैसे वसुल केले जे तु कुठल्या तरी जन्मी त्याच्याकडुन घेतले होतेस.. हे म्हटल्यावर ती एकदम शांत झाली ,,विचार करु लागली.. असही असतं का ?? .. असं तिने विचारलं ,मी म्हटलं शास्त्र तर हेच सांगतय आणि मी वाचलय..माझ्या एका वाक्यात तिची विचाराची दिशा बदलली… आपण जसं वागणार तसेच त्याचे रिटर्न मिळणार आहेत..
कोणीही व्यवहारात कधीही कोणाला फसवु नका.. कोणाची उधारी असेल तर ती आताच देउन टाका नाहीतर तो या ना त्या रुपात वसुल करणारच.. यातुन सुटका कधीच आणि कोणाचीही नाही.. लाइफ खुप सरळ आहे फक्त आपण त्याला कठिण करतो..
सोनल गोडबोले..लेखिका