धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक – आमदार डॉ.तुषार राठोड जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या मागणीची पुर्तता ओपन जिमचा संपन्न झाला लोकार्पण सोहळा

 

मुखेड: ( दादाराव आगलावे ) हल्ली प्रत्येक माणूस तान तणावाच्या अधीन राहून जीवन जगताना दिसून येत आहे. कुटुंबातील एका व्यक्तीवर पूर्ण कुटुंब अवलंबून असते त्यासाठी या धावपळीच्या जीवनात माणसाने आपल्या शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे प्रत्येकाने योगासने व्यायाम करणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी राम प्रहरी जिमचा उपयोग करावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे प्रतिपादन मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले.

 

 

येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ असलेल्या ओपन जिमच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना आमदार डॉ. तुषार राठोड बोलत होते. ओपण जिमचे उद्घाटन मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृऊबाचे सभापती एडवोकेट खुशालराव पाटील उमरदरीकर, मुख्याधिकारी विजय पाट्टे, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगीरे, अशोकराव गजलवाड, शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, डॉ.एम.जे. इंगोले, डॉ. आर. जी. स्वामी, राम पत्तेवार, नाशेरखाॅं पठाण, सौ. शारदाताई हिमगिरे, गोपाळ पत्तेवार, डॉ.पी.बी. सीतानगरे, जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी, जिप्सी भूषण बलभीम शेंडगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आमदार डॉ. तुषार राठोड पुढे म्हणाले की, जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे, जय जोशी, बलभीम शेंडगे, बालाजी तलवारे, वैजनाथ दमकोंडवार व जिप्सीयन्स मला भेटून जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ ओपन जिमची मागणी केली त्या मागणीस होकार देऊन बा-हाळी रोडवरील मुख्य रस्त्यावर ओपन जिम उभारली आज त्यांचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. जीवनामध्ये व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्वांनी या ओपन जिमचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. या जिमचा महिलांनीही लाभ घेतला पाहिजे त्यासाठी त्यांना स्वतंत्र वेळ ठरवून द्यावी व सकाळ- संध्याकाळ पोलिसांची पेट्रोलींग सुद्धा या ठिकाणी आवश्यक असल्याची भावना आमदार डॉ. तुषार राठोड यांनी बोलून दाखवली. पाई चालणाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे जेणेकरून अपघात टाळता येतील समोरून येत असलेले वाहन आपणास दिसतील असे आमदार राठोड साहेबांनी सर्वांना संबोधित केले.
ओपन जिमचे उद्घाटन करताना उद्घाटक मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे म्हणाले की, या ओपन जिमचा उपयोग सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार करावा या जिमचा आगाऊ डोस होणार नाही याची दक्षता घ्यावी. डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या डोळक्यात राहून जगणे कधीही चांगले असा सल्ला मुखेड भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी यांनी करताना आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांनी आमच्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या विनंतीला होकार देऊन ही ओपन जिम सर्वांसाठी उभारली व आज खुली केली त्याबद्दल त्यांनी आमदार महोदय व नगरपालिकेचे आभार मानले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी केले तर आभार जिप्सीचे कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी मानले. कार्यक्रमास सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, संजीवनी सकाळचे अध्यक्ष राम राठोड, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष चरणसिंह चौहान, हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय कांबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, आर्ट ऑफ लिविंगचे शिवराज साधू, पं स. माजी सदस्य राजू घोडके, चंद्रकांत गरुडकर, गोविंद घोगरे, विनोद दंडलवाड, नगर परिषदेचे उत्तम नारलावार, भारत गजलवाड, शिवशंकर कुच्चेवाड, रफिक बागवान, लालू सोनकांबळे, राजेश फुलवळकर, रमेश पाटील, शिवाजी राठोड, सुधीर चव्हाण, शिवराज पाटील पांडुर्णीकर, अशोक चौधरी, शिवाजी कोणापूरे, लोकराज्य चे संपादक ज्ञानेश्वर डोईजड, महावीर शिवपूजे, नामदेव श्रीमंगले,भास्कर पवार, जीवन कवटीकवार, उत्तम अमृतवार, राजेश भागवतकर, सागर चौधरी, आकाश पोतदार, हनुमंत गुंडावार, माधव गुंडावार, अरुण पत्तेवार, सुरेश उत्तरवार, बालाजी वडजे, साईनाथ कोत्तापल्ले, पापा शेठ चौव्हाण, विठ्ठल मोरे, रवी लालपालवाले सह सर्व संघटनेचे पदाधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *