आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते मारतळा-नांदगाव- चिंचोली येथे 50 लक्ष रुपये रस्त्याच्या निधीच्या कामाचे उद्घाटन ..!

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार श्यामसुंदर शिंदे 

 यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश

प्रतिनिधी;

तालुक्यातील मारतळा- नांदगाव येथील 40 लक्ष रुपये कामाच्या रस्त्याचे उद्घाटन व नांदगाव- चिंचोली येथील दहा लक्ष रुपये कामाचे उद्घाटन काल रविवार लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, खरेदी-विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर,माजी सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर,माजी सरपंच राजू पाटील कापसिकर,सचिन पाटील कुदळकर,नांदगावचे सरपंच संतोष भरकडे, डोणवाडाचे सरपंच भगवान घोडके, हातनीचे माजी सरपंच सुनील भदरगे,माजी सरपंच पपू भुरे,सरपंच नागोराव कापसे, उद्धव पाटील नांदगावकर, सरपंच शिवाजी आळने,साई पाटील हातनीकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, मतदारसंघात सर्वात जास्त निधी उमरा सर्कलला उपलब्ध करून दिला असून मी या भागाचा आमदार म्हणून विकास कामात कधीही भेदभाव करणार नसून आम्ही जात-पात धर्मपंथ मानत नसून मानवता हीच एक जात मानत असल्याचे यावेळी आमदार शिंदे म्हणाले, मतदारसंघात सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी व या भागातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंदोळा येथे एक हजार कोटीची धरणे होणार आहेत या भागातील शेतकऱ्यांना दळणवळणासाठी व शेतकऱ्यांचा शेतीमाल मोठ मोठ्या शहरात वेळेत जाण्यासाठी ऐथून जाणारा समृद्धी महामार्ग हा प्रमुख मेट्रो सिटी ला जोडण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही आमदार शिंदे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना सह विविध शासकीय योजनांचा वंचित उपेक्षित नागरिकांना लाभ होण्यासाठी यापुढे गाव पातळीवर कॅम्प घेतले जाणार असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले. नांदगाव- चिंचोली- मारतळा या रस्त्याच्या 50 लक्ष रुपये कामाचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते पार पडल्याने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न आमदार शिंदे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला असल्याने या भागातील नागरिकांकडून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन होत आहे, यावेळी शेकापच्या प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.

*नांदगाव चे सरपंच संतोष भरकडे सह शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश*

 

यावेळी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या विकासाभिमुख व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदगावचे सरपंच संतोष भरकडे सह शेकडो तरुणांनी आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला, यावेळी आमदार शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *