गुप्तधनासाठी पुजा मांडणाऱ्या टोळीस भोजूचीवाडी तालुका कंधार च्या ग्रामस्थांनी पकडून दिले पोलीसांच्या ताब्यात ;अडीच वर्षांची मुलगी ही होती घटणास्थळी

कंधार : जमिनीतील गुप्तधन काढण्यासाठी शेतात खड्डा करून पूजा मांडल्याचा गंभीर आणि खळबळजनक प्रकार रविवार, दि.६ च्या मध्यरात्री कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी येथील एका शेतात घडला.

पुढील प्रकार होण्याआधीच काही जागरुक गावकऱ्यांनी हा डाव उधळून लावत त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्या लोकांसोबत अडीच वर्षांची मुलगी ही होती. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार होता काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एक अघोरी प्रकार कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी येथे उघडकीस आला.

 

रविवार, दि. ७ रोजी मध्यरात्री नामदेव तुकाराम देवकते यांच्या शेतात घडला. शेतमालकासह सात जणांनी मिळून शेतात खड्डा करून खड्ड्याजवळच नारळ, लिंबू, हळद, कुंकवाने पूजा मांडली होती. हा गंभीर प्रकार सुरू असताना काही गावकऱ्यांनी त्यांना पकडले. त्यानंतर ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रविवारी मध्यरात्रीनंतर दोन ते अडीचच्या सुमारास कंधार पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली.पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. यामधील संभाजी रामजी कागणे हे कंधार तालुक्यातील गांधीनगर येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक असल्याचे समजते. यासोबतच गांधीनगर आश्रमशाळेचे कर्मचारी तथा बहाद्दरपूरा येथील रहिवासी अनिल कामाजी कावळे (वय ३७), वडगाव, नांदेड येथील संजय जळबाजी पुयड (वय ५६), इंदिरानगर लोहा येथील मिस्त्री मुक्तार अब्दुल खादर शेख, यासोबतच कलंबर ता. लोहा येथील जमिनीतील धन पाहणारे देविदास संभाजी नागठाणे (वय ८०) आणि संभाजीनगर कंधार येथील छाया राजू जोंधळे (वय ३०) या लोकांचा समावेश आहे.

 

या सात जणांसोबत दोन ते अडीच वर्षाची एक मुलगी देखील आहे. ती मुलगी माझी असल्याचे छाया जोंधळे हिचे म्हणणे आहे. ही लहान मुलगी यांच्यासोबत आढळल्याने नरबळीचा उद्देश होता का? ती मुलगी त्या महिलेचीच आहे का नाही, या प्रकरणात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे हे ‘ तपासात स्पष्ट होईल, अशी माहिती सपोनि लोणीकर यांनी दिली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *