कंधार ; प्रतिनिधी
लोहा/कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांच्या नांदेड येथील स्मेरा निवासस्थानी कंधार तालुक्यातील मौजे बाचोटी येथील गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांची भेट घेऊन गावातील आडी अडचणी सौ.आशाताई शिंदे यांच्या समोर मांडुन विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी बाचोटी गावकरी यांच्या वतीने सौ.आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आवधुत पाटील शिंदे शेकाप जिल्हाध्यक्ष नांदेड,श्याम पा.कपाळे, गिरीश डिगोळे शेकाप नांदेड दक्षिण अध्यक्ष,खंडू वाघमारे, साहेबराव वाघमारे, पप्पू गायकवाड, अनिल गायकवाड, विश्वंभर वाघमारे, प्रभाकर वाघमारे, गजानन वाघमारे, किसन वाघमारे, पांडुरंग वाघमारे, राजू वाघमारे, गजानन वाघमारे, माधव वाघमारे सह इतर याप्रसंगी उपस्थित होते.