नांदेड ; प्रतिनिधी
भाजपा महानगर नांदेड,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे शंभर टक्के लोकसहभागातून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या कृपाछत्र उपक्रमाचा चौथ्या वर्षात खऱ्या गरजूंना
२०२३ छत्र्या वाटपाचा शुभारंभ भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते संध्या छाया वृध्दाश्रमात संपन्न झाला.या उपक्रमात देणगीदारांची नावे छत्रीवर दोन्ही बाजूला छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येत आहेत.
बुधवारी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील, अनुसूचित जाती प्रदेश कार्यकारणी सदस्य अभिषेक सौदे, सरदार प्रतापसिंग खालसा, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम टरके पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्या वाटप ठेवण्यात आल्याचे सांगून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. कंदकुर्ते यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या विविध उपक्रमामुळे भाजपचे नाव जनमानसात उंचावत असल्याचे सांगितले. शितल खांडील व अभिषेक सौदे यांची यावेळी समायोचित भाषणे झाली. सर्व वृद्धांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. कृपाछत्र उपक्रमासाठी भाजपा सिडको मंडलाध्यक्ष वैजनाथ देशमुख, गोपाळ माळगे,दिलीप ठाकूर, सुनील उबाळे,चंद्रकांत गंजेवार, स्नेहलता जायस्वाल हैद्राबाद, विश्वजीत मारोती कदम धानोरा कौठा,सिद्राम सूर्यभान दाडगे,अविनाश रामभाऊ चिंतावार मुबंई,शैलेश इनामदार ठाणे,मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी,सुधाकर रामराव जबडे देगलूर,वसंत अहिरे,संजय प्रभाकर कलकोटे, सुनीता दीक्षित वसरणी,भीमाशंकर जुजगार छ.संभाजीनगर,सौ.प्रमिला महेश भालके, उमाकांत वाखरडकर,महंत कैलास चरणदास वैष्णव
यांचे सहकार्य लाभले आहे.उद्दिष्ट पूर्तीसाठी १५६३ छत्र्यांची आवश्यकता असल्यामुळे किमान १५ छत्र्यासाठी रू.२४०० देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्याच देणगीदारांच्या हस्ते करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी
दानशूर नागरिकांनी या उपक्रमासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे, सचिव सदाशिव पाटील,कोषाध्यक्ष सुनील साबू यांनी केले आहे.
(छाया: संघरत्न पवार)