मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कंधार ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न

  1.  दि:-०८/०८/२३ रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक:-२४ जुलै २०२३ रोजी चे पत्र तसेच नांदेड जिल्ह्याचे मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या दिलेल्या पत्राच्या आदेशानुसार कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजू टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कंधार ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
    कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजू टोम्पे यांच्या हस्ते ठिक ११:०५ वा फीत कापून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जवळजवळ ११ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले आहे.
    तसेच यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले,
    डॉ.संतोष पदवार रक्तदान शिबिरासाठी नांदेड रक्तपेढी येथून आलेल्या पथकातिल कर्मचारी श्री.रवी श्रीमंगले,प्रेम जोगदंड ,
    राम महाजन,श्रीमती.लताबाई वाघोळे,वर्षा डाकोरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
    शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *