कंधार ; दिनांक 9 ऑगस्ट (प्रतिनिधी.)
भोसीकर कुटुंबीय हे आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी प्रतिवर्षी साजरा करत असतात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज संजय शिक्षण संस्था कंधारचे उपाध्यक्ष युवा नेते कृष्णाभाऊ संजय भोसीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा बहादरपुरा तालुका कंधार येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई भोसीकर, सरपंच हणमंतराव पाटील पेठकर, यशवंत पाटील भोसीकर, ग्रामविकास अधिकारी एस एन.गिरी, ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील पेठकर,सौ.कल्पनाताई पेठकर, शंकरराव खरात,भिमराव कदम,रेशम कुरुंदे,शरद पाटील पेठकर,गेंदाजी गायकवाड,शाळेचे मुख्याध्यापक गवळी सर गावातील नागरिक शिक्षक शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विदर्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ चे वाटप कृष्णाभाऊ,व सौ.वर्षाताई उपस्थित मान्यवारंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णाभाऊ यांना गावकर्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मान्यवरांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी सौ.वर्षाताई त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देऊन प्रगती करण्याचे आवाहन केले व पालकांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त शाळेत पाठवून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उच्च शिक्षण घेऊन आपल्या जीवनातील प्रगती साधावी असेही आवाहन सौ.वर्षाताई यांनी सध्या डोळ्या ची साथ चालू असून मुलांची काळजी घेण्याची सूचना यावेळी केली .वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल कृष्णाभाऊ यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत पाटील पेठकर यांनी केले.