कंधार – प्रतिनिधी
जुलै महिण्यात नांदेड जिल्हयासह लोहा, कंधार तालूक्यातही अनेक ठिकाणी – अतिवृष्टी झाली असुन निष्क्रीय आमदार खासदार व बेजबाबदार प्रशासकीय यंत्रनेमूळे लोहा कंधार तालूक्यात शेतीचे नुकसान झाले नाही असा अप्रस्तुत व शेतकरी विरोधी अहवाल शासनाकडे दिला गेला असुन त्याचा निषेध करण्यासाठी भारत देशाच्या पुर्व दिनी दिनांक १४ ऑगस्ट रोजी “भारत राष्ट्र समितीच्या” (B.R.S.) वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. शेतकरी नेते माजी आमदार (B. RS.) प्रमुख शंकर अण्णा धोंडगे यांनी आज दि. ११ ऑगस्ट रोजी कंधार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, दिनांक ६ जुलै पासून महिनाभर सर्व मंडळात ७० ते ८० मी.मी. पाऊस किमान सहा वेळा झाला असुन केवळ येथील आमदार, खासदाराच्या निष्क्रीयेतेमुळे नुकसानग्रस्तासाठीच्या मदती पासुन व पूढे मिळणाऱ्या पिकविम्या पासुन शेतकऱ्यांना वंचीत ठेवण्याचे काम इथल्या लोकप्रतिनिधी कडून झाले असुन शेतकऱ्यांच्या दुःखाचे व हक्काचे सबंधी यांना काही देणे घेणे नाही हे पुन्हा सिध्द झाले आहे. दोन वर्षापूर्वी सुध्दा या आमदार खासदारांच्या दुलर्क्षामुळे लोहा कंधारातील शेतकरी विम्यापासून वंचीत राहिले होते. शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी व लोहा कंधार तालुक्याला सुध्दा झालेले पर्जन्यमान लक्षात घेवून नुकसानग्रस्ताच्या यादीत समाविष्ठ करण्यासाठी या धडक मोर्चाचे आयोजन असल्याचे शंकर अण्णा धोंडगे यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेला दत्ता पवार ,अँड विजय धोंडगे, शिवदास धर्मापुरीकर ,दत्ता कारामुंगे , शिवराज पाटील धोंडगे , गोपीनाथ केंद्रे , सुभाष पाटील राहेरकर , विशाल गायकवाड , भरत चिखलीकर , शेख वहीद , अनिल मोरे , सरपंच सुनिल वाघमारे , शिवदास गोधणे , संतोष कागणे मल्हारी वरपडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .