….. बावीस वर्षाच्या मुलाचा प्रश्न..
लैंगिकतेचं प्रॅक्टीकल नाही काहो ??
सोनल मॅडम मी ११ वी १२ वी सायन्स केलय.. त्यात थेअरी पेक्षा प्रॅक्टिकल वर जास्त भर होता..बेडुक काप ,झुरळ काप..त्यांच्या प्रत्येक अवयवांच्या मनात आणि हृदयात उतरुन आम्ही त्याची माहीती घेतली तेव्हा कुठे आम्हाला माणसाच्या आत काय आहे याचा अंदाज आला.. खरं तर मला डॉक्टर व्हायचं होतं पण ॲडमीशन न मिळाल्याने मी इंजीनियरींग कडे वळलो .. मी व्हर्जीन आहे आणि तुमचे व्हीडीओ ऐकले आणि मनात विचार आला , सगळीकडे प्रॅक्टिकल चालतं मग इथे का नाही ??.. सोनल मॅडम नी व्हीडीओ मधे वापरलेले शब्द ऑरगॅझम , एनल सेक्स , स्खलन,तृप्ती हे ऐकायला छान आहे .. पण आम्हा मुलांना कळणार कसं??.. डायरेक्ट लग्न झाल्यावर ??.. माझ्या वयातील मुलीना तर यातलं काहीच माहीत नाही…मग मी बोलु कोणाशी ??.. लैगिंकतेचं शिक्षण दिलं जातं पण थेअरी पार्ट फक्त.. मासिकपाळीवर बोललं जातं पण ते अर्धवट असतं..सगळ्यात महत्वचा विषय इतका शेवटी का ??,,
जेव्हा त्याला मी भेटले तेव्हा अमोल हा प्रचंड स्कॉलर जाणवला.. पण तो वैतागलेला होता..त्याला म्हटलं तु तुझ्या आईवडीलांना विचारलेस का हे प्रश्न तर नाही म्हणाला.. सोशल मिडीया आहे.. प्रत्येकाच्या हातात महागडे फोन आहेत.. सगळ्या गोष्टी सगळीकडे सुरु आहेत.. मी लीहीतेय , बोलतेय तरीही या मुलाला हे प्रश्न पडावेत.. अशी अनेक मुलं असतील ज्यांना कुतूहल असेल.. ज्यांना उत्तरे हवी आहेत..
माझी मुलगीही याच वयात आहे…पण मी तिच्याशी सगळं बोलते मग आता याला काय उत्तर देउ??.. आता त्याला मी फॅंटसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी दिली आहे ..
ती वाचल्यावर त्याचे पुढचे प्रश्न काय असतील याच्या प्रतिक्षेत आहे..
मुलांना प्रश्न पडायलाच हवेत आणि आपल्याला त्याची उत्तर देता यायलाच हवीत पण जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा मात्र आपणच नव्याने विचार करायला लागतो .. माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती ती म्हणजे त्याला तो स्पर्श हवा होता.. तो फील घ्यायचा होता.. त्याचं कोवळं वय आणि कोवळं मन याचं द्वंद्व सुरु होतं.. आणि मी मात्र त्या निरागसतेचं उत्तर द्यायला हतबल होते.. मी विचार केला त्या वयात मला हे प्रश्न पडले होते का ?? .. की हा कोणीतरी extra ordinery मुलगा आहे.. की सगळ्यानाच हे प्रश्न पडत असावेत ??..
डोक्याची जाम मंडइ झाली राव..
सोनल गोडबोले