कंधार :- ( धोंडीबा मुंडे )
अन्न व औषध प्रशासन नांदेड च्या प्रभारी आयुक्तपदी नामदेव भालेराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल कंधार मेडिकल असोसिएशनच्या वतीने चालीकवार निवास भवानी नगर कंधार येथे सत्कार सोहळ्याचे दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११:३० आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चालीकवार सर व कंधार मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक चालीकवार यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी कंधार मेडिकल असोसिएशनच्या वतीने नांदेडच्या प्रभारी आयुक्तपदी नामदेव भालेराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित खदीर शेठ,उद्धव जायभाये,कैलास विभुते,अमोल गबाळे,धोंडीबा मुंडे,साईनाथ कोटगिरे,ऋषिकेश मुसळे,केशव नाईकवाडे,साईनाथ व्यास,प्रदीप व्यास,श्रीकांत जक्कवाड,केदार मंगनाळे,ज्ञानेश्वर कागणे,गिरीश श्रीनिवास,खुशालसिंह ठाकुर आदी उपस्थित होते.