नांदेड-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रविवार,दि.१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता कै.डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर, नांदेड येथे एक शाम आजादी के नाम हा देशभक्तीपर अजरामर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बहुजन कलावंत न्याय हक्क समिती यांच्या वतीने हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे राहणार असून भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.सदर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे हे आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजप उत्तर विधानसभा अध्यक्ष मिलिंद देशमुख,माजी नगरसेवक दीपक सिंह रावत, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश उर्फ बाळू खोमणे,मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक प्रकाश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते संजय जोंधळे, कैलास सावते, बालाजी गिरगावकर, बाबुराव पाटील, मोहन गर्दनमारे,राहुल चिखलीकर, बाली कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.
या आगळावेगळा देशभक्तीपर संगीतमय मेजवानीचा लाभ नांदेडकरांनी घ्यावा असे आवाहन बहुजन कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष विकास जोंधळे, बालाजी गवाले, तुळशीराम कांबळे, कवी नागोराव डोंगरे यांनी केले आहे.