वानराचा अडकलेला फासा काढून वानरास दिले पक्षीमित्र सिद्धार्थ काळे यांनी जिवदान ;उदगीर तालुक्यातील घटणा
उदगीर ; प्रतिनिधी
वाडवना ता .उदगीर येथे वानराच्या पिल्लाला फासा बसलेला नागरीकांना दिसुन आला. फासा बसल्यामुळे वानराच्या पिलाचे पुर्ण तोंड व गळा जास्त सुजला होता व डोळे सुजले एक डोळाबंद होत.
दुसरे फासा काढण्याचा प्रयत्न केला असता त्या मानसाला चावा घेत होती म्हनुन तो फासा काडन्याची कोनीही हीमत झाली नाही . मात्र दि.३० जुलै रोजी पक्षीमित्र सिद्धार्थ काळे यांनी मोठ्या सिताफिने त्या वानराच्या पिलाची सुटका करुन जिवदान दिले.
येथील सर्पमित्रांनी व गावातील नागरीकानी संपर्क करुन सर्पमित्र तथा पक्षीमित्र सिद्धार्थ काळे बोलावुन घेतले व ते पलु पकडुन त्याच्यावर पशुवैघकिय दवाखान्यात उपचार करुन त्याला गावातच सोडुन दिले ते वानर मानसाळलेले होते जवळपास ते वानर 10 वर्षापासुन त्या गावात रहात होते. सर्पमित्र ,प्राणीमित्र सिध्दार्थ काळे शेलदरा व सर्पमित्र दत्ता वाघमारे वाडवना , एजाज शेख, सुरज काळे,परमेश्वर कारभारी, म्हमद पठान, क्रष्णा भांगे, नितीन सुर्यवंशी यांनी जख्मी वानर पकडन्यासाठी परीश्रम घेतले.