कंधार येथिल श्री शिवाजी हायस्कूलचे आदर्श शिक्षक बगाडे यांच्या सेवापुर्ती निमित्याने

कंधार येथिल श्री शिवाजी हायस्कूलचे आदर्श शिक्षक बगाडे यांच्या सेवापुर्ती निमित्याने….

कंधार; दत्तात्रय एमेकर

कंधार शहरात ज्ञानाचे लंगर असलेली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारची मातृशाखा म्हणजेच श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार ही शाळा संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे,भाई गुरुनाथरावजी कुरुडे या मन्याडीच्या आदर्श जोडगोळीने कंधार सारख्या डोंगरदर्याच्या तालूक्यात शिक्षणाची वाणवा होती.त्या दोघांनी व त्यांच्या साथीदारांनी स्वतःला झालेला त्रास दीन-दुबळ्यांच्या अन् सुग्या-मुग्यांच्या लेकरांना दुरडीतली भाकर खाऊन शिक्षण घेता यावे यासाठी ज्ञानाची अनेक लंगरे मन्याड खोर्यांची ज्ञानमाता मुक्ताईच्या सुचने वरुन निर्माण केली.आज घडीला शालेय समिती अध्यक्ष व संस्था सहसचिव अॅड.मुक्तेश्वरभाऊ धोंडगे आणि संस्थाध्यक्ष डाॅ.प्रा. पुरुषोत्तमभाऊ धोंडगे यांच्या पुढारात ही संस्था अन् शाळा मार्गक्रम करते आहे.

या शाळेत 33 वर्ष ज्ञानदानाचा वसा घेतलेले डोंगरगाव नगरीचे भुमीपुत्र नारायण-द्रोपदाईसुत यांनी आपली अध्यापणाची सेवा केली.वयोमाना नुसार बगाडे सरांची सेवापुर्ती 31 जुलै 2020 रोजी झाली आहे.डोंगरगाव नगरीत एका शेतकरी कुटुंबात जन्माला येवून खडतर असा शैक्षणिक प्रवास करुन कंधार शहरातील नामांकित श्री शिवाजी हायस्कूल येथे 1987-1988 साली.म.फुले विद्यालय गोकुंदा ता.किनवट या 1986-1987 या शैक्षणिक वर्षात ज्ञादानाचे कार्य करुन रुजू.त्या नंतर 1988-89 ला नोकरीत कायम झाले.त्यांचे इयत्ता दहावी पर्य॔तचे शिक्षण गावातच म्हणजे दत्तात्रय विद्यालय डोंगरगाव येथे गावातच झाले.इयत्ता 11 पासून ते बी.ए.पर्तंतचे शिक्षण म.गांधी महाविद्यालय अहमदपुर येथे 1982-83 पर्यंत झाले.बी.एड् 1984-1985 या वर्षी झाले.तर एम.ए.1986 ला पिपल्स काॅलेज नांदेड येथे केले.या आयुष्याच्या शैक्षणिक प्रवासात त्यांनी अनेक खस्ता खाल्या.त्यांच्या 33 वर्षाच्या आदर्श शिक्षकी पेशात अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत.माझा अन् बगाडे सरांचा सहवास फक्त दोन वर्षाचा आला.ते पर्यवेक्षक म्हणुन पदभार अनेक वर्ष नेटाने सांभाळला वर्ष भाग शाळा बहाद्दरपुरा युनिट प्रमुख म्हणुन व्यवस्थित सांभाळले.
प्रभारी मु.अ.म्हणून दोन महिने कोरोना काळात सांभाळले.आज 31 जुलै 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या कोरोना संकटामुळे सेवापुर्तीचा सोहळा अंत्यंत साध्या पध्दतीतून शाळेत होत आहे. भविष्यकाळातील जीवनास व आरोग्यास बगाडे सर त्यांच्या धर्मपत्नी सौ.चित्रकला दत्तात्रय बगाडे या व्दयांना ,मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर,ज्यनिअर विभाग प्रमुख प्रा.सदानंद कांबळे सर,उर्दु ज्यनिअर विभाग प्रा.हिदायत उल्ला बेग सर माध्यमिक उर्दु विभाग आणि भाग शाळा बहाद्दरपुरा या सर्व सहकारी स्टाफच्या वतीने मनस्वी सदिच्छा व मानाची कोटी-कोटी जयक्रांति.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *