कायमच पुरुषांवर प्रेम करणारी मी आणि प्रेमळ फटके देणारीही मीच.. ते मला ट्रोल करणं सोडत नाहीत आणि मी त्यांच्या नाकावर टिचुन माझे फोटो शेअर करणं असेल किवा पुरूष हृदय लिहीणं थांबवत नाही कारण माझं जीवन कसं जगायचं हे मीच ठरवते..
शॉर्ट ड्रेसवर टाकलेल्या फोटोवर १५०० पेक्षा जास्त लाइक्स आणि अनेक कमेंट्स आणि साडीतील फोटोवर ५०० लाइक्स आणि ह्याच फोटोवर माझे पुरूष मित्र ॲम्बुलस्न सारखे वॉववॉव करत असतात.. जर माझ्या मित्रांना शॉर्ट ड्रेसचं वावडं आहे तर मग साडीतील ड्रेसवर तितकेच लाइक्स का नसावेत.. चवीचवीने चघळणार आणि …. विचार करा मित्रांनो .. तुम्ही ट्रोल करा मी माझं काम करणार.
स्त्रीच्या नावाने प्रोफाईल करायची आणि माझ्याशी चॅट करायचा प्रयत्न करायचा .. पुरूष आहात ना मग करा ना मोकळेपणाने मेसेजेस.. तुम्ही मेसेजेस करा आणि मी पुरूष हृदय लिहीते.. तुम्ही फ्लर्टींग करता म्हणुन मला मसाला मिळतो..करत रहा पण पुरूष म्हणुन करा..
फॅंटसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स चोरून चोरुन वाचण्यापेक्षा उघडपणे वाचा त्यातुन फायदाच होणार आहे… त्यात दिलेली माहीती ही अज्ञानातुन तुम्हाला बाहेरच काढेल .. मी पुरुषांचा प्रचंड आदर करते त्यामुळे लपवाछपवी नको.. बिंधास्तपणे बोला आणि वागा.. मला खरी आणि मनमोकळी माणसं खुप आवडतात..
एकजण तर मला रोज मेसेज करतो.. मॅम मी तुमच्यासाठी काहीही करु शकतो.. भावा मला काहीही नको.. तु तुझा मौल्यवान वेळ माझ्यासाठी वाया घालवु नकोस… त्या वेळात हरीनाम घे.. फायदा तुझाच आहे.. आणि जे काही द्यायचे ते तुझ्या बायकोला दे.. मनापासून तुझी आभारी आहे..
कोणी कोणी मला मेसेजेस करतं , आम्ही ट्रोल करतो तुम्हाला राग येत नाही का ??.. त्यावर मला त्यांना विचारायचय , नक्की तुमची अपेक्षा काय आहे ??.. मला राग यावा ही की अजून काही… मला कशानेच काहीही फरक पडत नाही.. तुम्ही तुमचा वेळ कुठे खर्च करावा हे तुमच्या हातात आहे आणि मी कुठे करावा हे माझ्या हातात आहे..
त्यामुळे फ्लर्टींग करत रहा आणि आनंदी रहा ..
सोनल गोडबोले
.