अहमदपूर येथे 15 ऑगस्ट च्या संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संवाद ग्रुप आयोजित बहारदार देशपर गीतांची मैफिल झाली.
या सुरेल देश भक्ती पर गीतांच्या मैफिलीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय बाळासाहेब जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक एन डी राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय शिवानंद तात्या हिंगणे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय मनीष कल्याणकर साहेब राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष दयानंद पाटील नगरसेवक अभय मिर्कले युवा नेते आशिष तोगरे रहीम खा पठाण माजी नगरसेवक, हुसेन भाई शेख सुनील डावरे इत्यादी होते.
गायक इ स र त कादरी यांनी मेरे देश प्रेमियो या गाण्यापासून मैफिल ला सुरुवात केली , टाळ्यांच्या कडकडाटमध्ये त्यांनी ये मेरे प्यारे वतन हे बहारदार गीत सादर केले.
कुमारी शेख माहीन यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर करून जनसमुदायाचे मन हे लावून सोडले.
आवाजाचा बादशहा रहीम खा पठाण यांनी हे प्रीत जहा की रीत सदा, कर चले हम फिदा, मेरे देश की धरती असे एकापेक्षा एक वरचढ गीत सादर करून संगीत मैफिल मध्ये उत्साह निर्माण केला, गायक बालाजी झुंजुरवार यांनी हर करम आपणा करेंगे आणि ये देश है वीर जवानो का हे गीत सादर केले आणि अक्षरशः श्रोते डोलायला लागले.
किलबिल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर श्री ज्ञानोबा भोसले यांनी चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है हे भारतीय जवानांच्या जीवनावरील गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. प्राध्यापक राजूभाऊ लामतुरे यांनी वो देश मेरे आणि जयस्तुते हे गीत सादर केले.
पीएसआय प्रभाकर आंदोरीकर यांच्या मधला देश प्रेम जागृत झाला आणि जो तुम कहे वही बात हम करेंगे हे गीत डीवायएसपी मनीष कल्याणकर साहेब यांच्याकडे बघत बघत सादर करून त्यांनी डीवायएसपी मनीष कल्याणकर साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय बाळासाहेब जाधव साहेब यांच्याही टाळ्या घेतल्या.
मोहम्मद अरिफ यांनी आपके बरस तुझे धरती की रानी कर देंगे हे सुंदर गीत गायले तसेच किशोर कुंभारकर यांनी ये देश है वीर जवानो का हे गीत भयंकर जोश मध्ये येऊन म्हटले त्यांच्याकडे पाहून जनसमुदाय सुद्धा नृत्य करू लागला.
कुमारी गौरी पुणे यांनी ए वतन वतन मेरे आबाद रहे तू हे बहारदार गीत सादर केले, सागर कुलकर्णी यांनी मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती हे देशपर गीत सादर केले
अहमदपूर पंचक्रोशीतील गायिकांनी एकापेक्षा एक वरचढ गीत सादर केले या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि कलापुष्प अकादमीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर भालेराव यांनी केले
हे कार्यक्रम यशस्वी घडवून आणण्यासाठी संवाद ग्रुप चे अहमद तांबोळी, मोहम्मद नाजीम भाई शेख जिलानी फारुख मणियार सोनू हिवरे आणि संवाद ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परि श्रम घेतले अहमद तांबोळी यांनी सर्वांचे आभार मानले आणि राष्ट्रगीता नंतर या रंगलेल्या मैफिलीचे समारोप करण्यात आले