जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून पत्रकार संरक्षण कायद्याच्या परिपत्रकाची होळी करून निषेध ..! जिल्हाधिकाऱ्यांना दिले लेखी निवेदन

 

नांदेड ( प्रतिनिधी ):- राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि पत्रकारांना संरक्षण देण्याच्या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त देशमुख यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेला पत्रकार संरक्षण कायदा मुजोर राजकारण्यांच्या दबंगगिरीमुळे कुचकामी ठरतो आहे . राज्य सरकार या कायद्याची कठोर अंमलबजावणी करत नसल्यामुळे पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढले आहेत. या बाबीचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी ( दि.१७ ) नांदेड येथे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आय टी आय चौक येथील म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संरक्षण कायद्याच्या परिपत्रकाची होळी करून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. आ. किशोर पाटील आणि त्यांच्या गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यमांवर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हल्ले होत आहेत. बातम्या विरोधात का प्रकाशित केल्यामुळे अनेक पत्रकारांचा बळी घेतला गेला. त्यामुळे पत्रकारांचे कायद्याने संरक्षण व्हावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आणण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस . एम. देशमुख यांच्या अथक परिसरमातून महाराष्ट्र सरकारने हा कायदा पारित केला. 2017 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला असला तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही महाराष्ट्रात होत नसल्याची दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्यातील तरतुदी माहित नाही इतके अज्ञान या कायद्याबाबत राज्यात आजही आहे. त्यामुळे एखाद्या पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हे दाखल करून मुजरांना चाप लावली जात नाही . अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आ. किशोर पाटील यांनी त्यांच्या गावगुंडा मार्फत केलेला हल्ला हा अत्यंत निषेधाहार्य आहे. या हल्ल्याचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निषेध होत असतानाही आ. किशोर पाटील यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आला नाही. उलट राज्य सरकार या घटनेकडे पाठ फिरवून उभे आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांचे कायद्याने रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय परिषदेचे विश्वस्त देशमुख यांनी घेतला. त्यानुसार आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यावर आणि तालुका स्तरावर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली .
नांदेड येथे आयटीआय चौकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आज जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली . यावेळी आ. किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली . या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे, प्रसिध्दी प्रमुख दिगंबर गायकवाड, परिषद सदस्य सुभाष लोणे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे , जिल्हा सरचिटणीस राम तरटे , जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, महानगर अध्यक्ष शिवराज बीच्चेवार, सचिव बजरंग शुक्ला, डिजिटल मीडियाचे जिल्हा सरचिटणीस संघरत्न पवार यांच्यासह पत्रकार मनोहर कदम, प्रमोद गजभारे, भास्कर जामकर ,सुरेश काशिदे, कुवरचंद मंडले, राजकुमार कोटलवार , रवींद्र संगनवार , गौतम गळेगावकर , प्रल्हाद कांबळे , नितीन नरवाडे , संजय सूर्यवंशी, नरेश दंडवते , अविनाश पाटील , पुरुषोत्तम जोशी , महेंद्र आठवले, भूषण परळकर , किरण कुलकर्णी गजानन कानडे, प्रल्हाद लोहेकर , सूर्यकुमार यन्नावर, संगमेश्वर बाच्चे, रघुनाथ पोतरे , कंथक सुर्यतळ , अविनाश पाईकराव , अविनाश पाटील, श्याम कांबळे, दीपक कसबे , सतीश बनसोडे, विकास कदम, सुभाष काटकांबळे , चेतन चौधरी , दीपंकर बावस्कर , मिलिंद दिवेकर , अजिंक्य घोंगडे , प्रशांत गवळे, प्रवीण देशमुख डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंधारे , राजू गिरी, जयप्रकाश नागला, श्याम कांबळे, मोहम्मद नाहीद समी, अभिषेक एकबोटे आदींची उपस्थिती होती. पत्रकार संरक्षण कायद्याच्या होळी केल्यानंतर पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *